बीड । वार्ताहर
जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी व सध्या सुरू असलेल्या अपत्ती पासून संरक्षण करण्याकरीता आयुष मंत्रालयाने अर्सनिक अल्बम 30 हे औषध सुचवलेले असून ते वितरण करण्या करिता आयुष विभाग जिल्हा रुग्णालय बीड व सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हा उपक्रम सुरू केला आहे. या होमिओपॅथिक औषधांचे वितरण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.राम देशपांडे, डॉ. आय व्ही शिंदे.डॉ.सचिन आंधळकर, डॉ.बाबासाहेब ढाकणे, डॉ.हुबेकर डॉ.राजपूत, डॉ.अजय राख यांना मार्गदर्शन करून डॉ.महेंद्र गौशाल प्राचार्य सोनाजीराव क्षीरसागर वैद्यकीय महाविद्यालय बीड यांनी औषध वाटप केले. यावेळी आयुष विभागाच्या वतीने डॉ.सचिन एस. वारे होमिओपॅथी तज्ञ यांनी औषधाची मात्रा कशा प्रकारे व किती दिवस घ्यावी हे मार्गदर्शन केले तसेच यावेळी डॉ.गणेश पांगारकर उपप्राचार्य सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालय बीड डॉ.मीना हंगे डॉ.शमा शहा, डॉ.पी संतोषी, नायब खान व सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालयाचा इतर स्टाफ उपस्थित होता त्यानंतर प्रशिक्षणास आलेल्या 50 ते 60 पोलिस बांधवांना होमिओपॅथिक औषध वितरण करण्यात आले हे विशेष त्यामुळे त्या सर्वांमध्ये उत्साह निर्माण झालेला दिसत होता त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांचे व प्राचार्य महेंद्र गौशाल यांचे आभार मानले. हा उपक्रम राबवण्यासाठी प्रभारी जिल्हा आयुष अधिकारी डॉ.कुलकर्णी यांनी सहकार्य केले त्यांचे आभार डॉ.सचिन वारे यांनी मानले.
Leave a comment