डोंगरकिन्ही । वार्ताहर
डोंगरकीन्ही ता.पाटोदा येथील फौजी असलेले संजय मळेकर हे जबलपूर (मध्यप्रदेश) येथून देश सेवा पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त होऊन मंगळवारी दुपारी त्यांच्या घरी परतले. यावेळी त्याच्या पत्नी असलेल्या आशा स्वयंसेविका अशाबाई टेकाळे यांनी मात्र आपल्याच पतीला 28 दिवसासाठी साठी शेतात क्वॉरन्टाईन केले.
डोंगरकिन्ही(मळेकरवाडी) येथील आशाबाई टेकाळे या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत आशा स्वयंसेविका म्हणून काम करतात,त्याचे पती हे देशाच्या रक्षणासाठी सीमेवर होते. ते 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. पण देशभर लॉकडाऊन असल्याने त्यांना गावी येता आले नाही. त्यांनी गावी येण्यासाठी प्रशासनाकडून कायदेशीर परवानगी घेऊन ते मंगळवारी ते सायंकाळच्या दरम्यान गावात पोहोचले. मात्र आशा स्वयंसेविका असलेल्या त्यांच्या पत्नी आशाबाई टेकाळे यांनी मात्र स्वतः च्या पतीला घरापासून काही अंतरावर शेतात क्वॉरन्टाईन केले. देश सेवक असलेले त्यांचे पती संजय मळेकर यांनी ही आपल्या पत्नीची सूचना मान्य करत क्वॉरन्टाईन झाले. त्याच्या या पती पत्नीच्या देश भक्तीचा प्रामाणिक कर्तव्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
Leave a comment