कुलथे फॅमिली व्हाट्सअप ग्रुपचा अभिनव उपक्रम
बीड । वार्ताहर
संपूर्ण जगामध्ये करोना विषाणूने थैमान घातले असल्यामुळे संपूर्ण देश मागील अनेक दिवसापासुन व पुढे तीन तारखे पर्यत लॉकडाऊन आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सराफा संपुर्ण बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या सुवर्णकार कारागीर व मोल मजुरी करणार्या समाज बांधवांना मदतीचा हात देऊन आपण त्यांचे काही देणे लागतो हे डोळयासमोर ठेवून महाराष्ट्र कुलथे फॅमिली ग्रुपने आगळा वेगळा समाजिक कार्यक्रम घेऊन आपल्या बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला.
बीड शहरातील कारागिर व मोल मजुरी करणार्या आपल्या बांधवांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र कुलथे फॅमिली गु्रपच्या वतीने फूल ना फुलाची पाकळी म्हणून एका कुटूंबास गहू आटा 5 किलो, चनादाळ 1 किलो, साखर 1 किलो, तेल 1 लिटर, पोहा 1 किलो, मुरमुरे 500 ग्राम, चहा 100 ग्राम, मिर्ची पाउडर, जिरे 50 ग्राम, हळद 50 ग्राम, मिठ पुडा 1 किलो, कपड्याचा साबण, अंम्बारी मसाला, इत्यादी वस्तूच्या किटचे वाटप बीड शहरातील कारागिरांना व मोल मजुरी करणा-या गरीब कुटूंबांना करण्यात आले.या किट वाटपाचा कार्यक्रम पत्रकार कमलाकर कुलथे, संजय कुलथे,हनुमंत कुलथे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. ग्रुप अॅडमिन जळगांव जामोद सराफ सुवर्णकार असोसिएशन उपाध्यक्ष संतोष कुलथे, दैनिक टाइम्सचे निवासी संपादक कमलाकर कुलथे, बीड, तसेच परभणी सराफ असोसिएशन जिल्हा संघटक अमोल कुलथे पांगरकर, यांच्या संकल्पनेतुन ही सामाजिक कल्पना साकार झाली असुन या उपक्रमास सर्वात मोठी साथ दिली ती आपल्या ग्रुप मधील दानशुर सदस्यनी. आर्थिक पाठबळ दिल्यामुळ हा सामाजिक उपक्रम यशस्वी झाला.या उपक्रमा अंर्तगत जमा झालेल्या आर्थिक निधीतुन बीड येथील 22 गरजू कुटूंंबाना तर परभणी येथील 25 गरजु कुटूंंबाना असे एकुन 47 कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप करण्यात आले.
Leave a comment