जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आदेश
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातील कापसाचे अधिकचे उत्पादन लक्षात घेवून आता प्रमाण लक्षात घेवून आता जिल्हाभरातील कापूस खरेदी केंद्रावर दररोज 20 ऐवजी दोन टप्प्यात 50 वाहनातील कापूस खरेदी करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. बुधवारी (दि.29) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे आदेश जारी केले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या या आदेशानुसार आता खाजगी जिनिंगवरही कापूस खरेदी होऊ शकणार आहे. बीड जिल्ह्यात कापसाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. सध्या पणन महासंघ आणि सीसीआयच्या केंद्रावर रोज 20 वाहनांच्या मर्यादेत कापूस खरेदिस परवानगी देण्यात आली आहे. मात्र कापसाचे प्रमाण जास्त असल्याने आता ही मर्यादा 50 वाहनांची करण्यात आली आहे. दिवसाला दोन टप्प्यात म्हणजेच सकाळी 10.30 ते दु. 1.30 यावेळेत 25 वाहने व दुपारी 2 ते सायं. 5.30 या दरम्यान 25 असे दिवसभरात एकुण 50 वाहने अशी करण्यात आली आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांचा किंवा एफएक्यु नसलेला कापूस खाजगी जिनींग चालक दररोज 50 वाहने या प्रमाणात खरेदी करु शकतील असे आदेशही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
---
Leave a comment