जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे निर्देश
बीड । वार्ताहर
कोरोना विषाणूच राज्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144010 (3) अन्वये 03 मे, 2020 पर्यत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात जमाव बंदी आदेश लागू केलेला आहे या कालावधीत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन झाल्यास कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
बीड जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यांमधून तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांमधून देखील विविध व्यापारी व व्यक्ती माल खरेदी-विक्रीसाठी व इतर कारणासाठी बीड जिल्ह्यामध्ये विनापरवाना प्रवेश करतात.यापैकी काही व्यापारी कोव्हीड-19 बाधित जिल्ह्यांमधून प्रवेश करत बीड जिल्ह्यामध्ये येतात. तसेच बीड जिल्ह्यातील नागरिक जिल्ह्याबाहेर जाऊन व्यवहार करुन येत आहेत. अशा व्यक्ती व वाहन चालक कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन ज्यामध्ये मास्क, साबण, डेटॉल किंवा हँड वॉश इ. चा वापर सुद्धा करत नाहीत असे दिसून येते. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जिल्हाबाहेर गेल्यावर किंवा जिल्ह्याबाहेरील व्यक्तीशी संपर्क करतांना कमीत-कमी एक मीटरचे अंतर ठेवावे. तसेच स्वत: नेहमी मास्क, रुमालाने तोंड व नाक पुर्ण झाकावे. जिल्ह्याबाहेरील किंवा कोणत्याही इतर व्यक्तीने हाताळलेल्या वस्तु, साहित्य पुर्णपणे निर्जतुक करुनच वापरावे. स्वत:ही आपले हात वारंवार साबण,सॅनिटायझरने स्वच्छ करावेत, या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी अन्यथा भारतीय दंडसंहिता 1860 (43) याच्या कलम 188 शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.
Leave a comment