बीड । वार्ताहर

बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या आठ तर अंबाजोगाईतील एक अशा नऊ जणांचे रिपोर्ट कोेरोना निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी (दि.29) सकाळी त्यांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. सायंकाळी हे सर्व रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यामुळे बीड जिल्हा कोरोनामुक्त कायम राहिला आहे.  

बीड जिल्हा आत्तापर्यंत कोरोनामुक्त राहिलेला आहे. आष्टी तालुक्यातील एका रुग्णाचा अपवाद वगळता जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. महत्वाचे म्हणजे तो रुग्णही कोरोनामुक्त होऊन आता गावी परतला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याचा मोठा दिलासा मिळालेला आहे.दरम्यान किरकोळ लक्षणे जाणवल्यानंतरही खबरदारी म्हणून संशयित विलगीकरण कक्षात दाखल होत आहेत. त्यांचे स्वॅब तपासणीला प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. बुधवारी नऊ जणांचे स्वॅब तपासणीला पाठवले गेले होते. ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यातील सर्व 203 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह ठरले आहेत. दरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. सध्या जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद असून पर जिल्ह्यातून कोणत्याही नागरिकाला जिल्ह्यात प्रवेश दिला जात नाही. नागरिकांनी घरातच थांबावे असे आवाहनही वारंवार आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहे. जिल्ह्यात सध्या 118 जण होम क्वॉरंटाईनमुक्त झाले असून 19 जण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 140 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एकुण 32 हजार 694 ऊसतोड मजुर परतले आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.