कोरोना संसर्गापासून पोलीस दूर ठेवण्यासाठी तपासणी होणार
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कोरोना (कोव्हिङ-19) विषाणूच्या अनुषंगाने सुरक्षात्मक उपाययोजना करण्यासाठी आता पोलीस कोव्हिड-19 सुरक्षा सेल स्थापन करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.28) पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए पोद्दार यांच्या आदेशाने हा सेल स्थापन केला असल्याचे सांगण्यात आले.
सध्या देशभरात कोरोना विषाणूंच्या प्रादूर्भावाचा उद्रेक सुरु आहे.त्यामध्ये राज्यातील पोलीस दल आघाडीवर राहून कर्तव्य बजावत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी व त्यांच्या कुटूंबियाच्या सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून बीड जिल्हा दलाच्या वतीने पोलीस कोव्हिड-19 सुरक्षा सेल स्थापन करण्यात आला असून या सेलचे प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक निरीक्षक गजानन जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे. बीड पोलीस दलातील सर्व पोलीस ठाण्यांचे व शाखांचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी व परिवाराचे सदस्यांचे कॅन्सर,टीबी, एचआयव्ही, मधुमेह, अतिलठ्ठपणा,हायपरटेंशन, स्टेरॉईडचे औषधोपचार सूरु असलेल्या व्यक्तींची माहिती घेवून पोलीस अधीक्षक सादर करतील. व यापैकी आजार असणाच्यांची कोव्हिड-19 संबंधाने स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाकडून वैद्यकीय तपासणी करून घेण्यात येणार आहे. सेलच्या माध्यमातून ज्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वरीलपैकी आजार आहेत त्यांना फिल्डवर कर्तव्य दिले जाणार नाही.याबाबत माहिती घेवून पाठिपुरावा व नियंत्रण करण्यात येईल.
पोलीसांना उपलब्ध करून देण्यात येणारे सूरक्षा साधने उदा. पिपीई किटफेस शिल्ड मास्क, मास्क,हॅण्ड ग्लोज,सॅनिटायझर इ. चे नियमित वाटप या सेलच्या मार्फत केले जाणार आहे. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन स्टाफची स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून प्रत्येक आठवड्याला कोव्हिड-19 अनुषंगाने वैद्यकीय तपासणी करून घेण्यात येणार आहे. दर आठवड्याला प्रत्येक पोलीस स्टेशनचे, पोलीस वाहनांचे, पोलीस साहित्याचे,पोलीस वसाहतीचे सोडीयम हायपोक्लोराईडने निरजतुकीकरण केले जाण्यासाठी बारीक लक्ष ठेवून ते करून त्यांचे घेण्याचे व पाठपूरावा करण्याचे काम या सेलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या सेलमधील सहाय्यक निरीक्षक गजानन जाधव व पोलीस कर्मचारी स्टाफ हे वरील सर्व प्रकारच्या कोव्हिड- 19च्या अनुषंगाने सुरक्षात्मक उपाययोजनांची अंमलबजावणीचा पाठपूरावा करत आहेत.
दररोज एसपींना तपासणी अहवाल सादर होणार
या सेलच्या माध्यमातून बीड पोलीस दलातील सर्व पोलीस ठाण्यांचे व शाखांचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी व त्यांचे परिवाराचे ताप, श्वसनास त्रास, खोकला, घशात खवखव व शारिरीक वेदना यांची दैनंदिन माहिती संबंधितांकडून घेवून संकलित करून त्याचा अहवाल पोलीस अधीक्षक यांना दररोज सादर होईल.
Leave a comment