गंगावाडी ग्रामपंचायतच्या स्तुत्य उपक्रमाचा 

आदर्श तलवाडा ग्रामपंचायत घेईल का?

 

तलवाडा । वार्ताहर

गेवराई तालुक्यातील तलवाड्या पासुन जवळ गोदकाठच्या तीरावर आसलेल्या गंगावाडी येथे कारखान्यावरुन परतलेल्या उसतोड कामगारांना जीवनावश्यक वस्तुच्या वाटपासह घरोघरी सॅनिटायझरचे वाटप करुन गंगावाडी ग्रामपंचायतने एक प्रकारे चांगला व स्तुत्य उपक्रम राबवला असुन या ऊपक्रमाची परिसरात मोठ्या प्रमानात चर्चा होत असुन नजीकच्या गाव ग्रामपंचायतने राबवलेल्या ऊपक्रमाचा तलवाडा ग्रामपंचायत आदर्श घेईल का? असा प्रश्‍न ग्रामस्थांतून विचारला जावू लागला आहे.

 

सध्या सर्वत्रच कोरोना सारख्या भयावह महामारीने थैमान घातलेले असुन पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यात व प्रराज्यात गेलेले उस तोड कामगार विविध कारखान्यावरुन उस तोडणीचे काम संपल्याने  कामगार मोठ्या प्रमाणात आपल्या गावी परतू लागले आहेत. गंगावाडी येथीलही उसतोड कामगार गावाकडे परतले असल्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता गंगावाडी ग्रामपंचायतचे प्रमुख दुरेश जिजा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील महिला सरपंच सुलोचनाताई बोराडे यांनी उसतोड कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन एक स्तुत्य उपक्रम राबऊन दिलासादायक कार्य केले. गावातील प्रत्येकाच्या घरोघरी परकुटुंब दोन दोन सेनिटायझरचे वाटप करुन लॉक डाऊनच्या काळात गावातील प्रतेक गल्ली बोळात आठवडा भरच्या फरकाने दोन वेळेस स्वच्छता मोहीम राबऊन गावात औषध फवारणी करन्यात आली असून गंगावाडी ग्रामपंचायतच्या या स्तुत्य उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आसतांना तलवाडा ग्रामपंचायत हा आदर्श घेईल का आशीही चर्चा परिसरात एैकन्यास मिळत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.