जिल्ह्यात आतापर्यंत 194 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
बीड | वार्ताहर
तापेची लक्षणे जाणवल्याने 8 जण आज बुधवारी (दि.29) येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल झाले.त्या सर्वांचे थ्रोट स्वँब नमुने आता तपासणीला पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
बीड जिल्हा आत्तापर्यंत कोरोनामुक्त राहिलेला आहे. आष्टी तालुक्यातील एका रुग्णाचा अपवाद वगळता जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. महत्वाचे म्हणजे तो रुग्णही कोरोनामुक्त होऊन आता गावी परतला आहे , त्यामुळे बीड जिल्ह्याचा मोठा दिलासा मिळालेला आहे.किरकोळ लक्षणे जाणवल्या नंतरही खबरदारी म्हणून संशयित विलगीकरण कक्षात दाखल होत आहेत. त्यांचे स्वँब तपासणीला प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत.बुधवारी घेतलेल्या आठ जणांच्या घशातील स्रावाच्या नमुन्यासह आत्तापर्यंत जिल्ह्यातून एकूण एकुण 202 जणांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले त्यातील 194 जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेला आहे.
दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. सध्या जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद असून पर जिल्ह्यातून कोणत्याही नागरिकाला जिल्ह्यात प्रवेश दिला जात नाही. नागरिकांनी घरातच थांबावे असे आवाहनही वारंवार आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहे. आजच्या आठ जणांचे रिपोर्ट सायंकाळपर्यंत प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात यांनी दिली
Leave a comment