जिल्हाधिकारी घटनास्थळी
गेवराई | वार्ताहर
तालुक्यातील गुंतेगाव परिसरात लाखो रुपये किमतीच्या वाळूची तस्करी करून नंतर त्याचा साठा करून ठेवण्यात आला होता. मंगळवारी ही माहिती मिळताच नदीपात्रालगतचा संपूर्ण वाळू साठा, चार ट्रॅक्टर ट्रॉली आदि साहित्य महसूलच्या पथकाने जप्त केले.दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही गुंतेगावात भेट दिली. या कारवाईमुळे गोदाकाठी वाळू उपसा करणाऱ्या माफियामध्ये एकच खळबळ उडाली.
सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण बीड जिल्हा प्रशासन व्यस्त आहे.जिल्ह्यात जमावबंदी आणि संचारबंदी लागू आहे; तरीही गेवराई तालुक्यात वाळू माफिया संधी साधून वाळूचे अवैध उत्खनन करून नंतर चोरटी विक्री करण्यासाठी या वाळूचा साठा करून ठेवत आहेत. तालुक्यातील गुंतेगाव परिसरात लाखो रुपयांचा वाळूचा साठा केल्याची माहिती मंगळवारी महसूलच्या पथकाला मिळाली होती, त्यानुसार नदीपात्रालगत सहा संपूर्ण वाळू साठा छापा मारून पथकाने जप्त केला. हे सर्व साहित्य देवराई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणात पुढील कारवाईची निर्देश यंत्रणेला दिले आहेत. घटनास्थळी बीडचे जिल्हाधिकारी राहुल
रेखावार यांच्यासह उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर महसूलचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
Leave a comment