नेकनुर/वार्ताहर
संचारबंदी शिथिलतेच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवा तेही ज्यांच्याकडे पोलिस अधीक्षकांच्या परवानगीचे पास असतील त्यांनीच दुकाने उघडावीत अन्यथा इतर कोणी आढळल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती नेकनुर पोलीस स्टेशनचे सपोनी सचिन पुंडगे यांनी लोकप्रश्न शी बोलताना दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी शिथिलतेच्या काळत परवानगी नसलेल्या अस्थपणा उघडू नयेत शिवाय अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यवसायिकांनी पोलीस अधीक्षकांची परवानगी असलेले पास नसतील तर दुकाने उघडू नयेत यापुढे प्रशासनाकडून सक्त कारवाई करण्यात येईल. जिल्ह्याच्या चोहोबाजूंनी कोरोना ने वेडा घातल्याने नागरिकांनी काळजी घेत विनाकारण घराबाहेर पडत गर्दी करू नये शिवाय बाहेरून येणाऱ्या नागरिकांची माहिती प्रशासनाला कळवावी नसता संबंधितावर कारवाईचा बडगा उगारला जाईल असेही स.पो.नी. सचीन पुंडगे यांनी लोकप्रश्न शी बोलताना सांगितले.
Leave a comment