किल्ले धारूर । वार्ताहर
शेतकर्यांसाठी शेतातील खरिपाची, रब्बीची मळणी करून थेट मोंढ्यात जात आहेत. मोंढा चालू असल्याने शेतकर्याला मोठा दिलासा भेटला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत संचारबंदी लागू केली असता महाराष्ट्र शासनाने यातून शेतकर्यांसाठी काही प्रमाणात शितीलता दिली आहे यात शेतीसाठी अवजारे ट्रॅक्टर तसेच आडत दुकाने चालू ठेवण्यासाठी चे आदेश देऊन चालू केले आहेत.
कोरोनामुळे शेतकर्यांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. थोड फार रब्बीचे उत्पन्न निघाले असता खरिपाच्या पेरणीसाठी ठेवले असता यात काम नसल्यामुळे आर्थिक टंचाई जणू लागली असता शेतकरी मोठ्या प्रमाणात मोंढ्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी शेतकरी सुद्धा सोशल डिस्टन्स ठेऊन विक्री करत आहेत. तूर, हरभरा, कापूस या पिकांची शासकीय खरेदी तात्काळ सुरू करून त्या मालाचे पैसे शेतकर्यांना दिल्यास तो पैसे शेतकर्यांना पुढील खरीप पेरणीसाठी खात बी बियाणे घेण्यासाठी उपयोगी होईल जर ही शासकीय खरेदी चालू झाली नाही तर खरीप हंगामावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतील.
Leave a comment