गेवराई । वार्ताहर
तालुक्याातील गरजु गोर गरीब नागरिकांना शासनपातळीवरील योजनेचा लाभ मिळत नाही. असे नागरिक लॉक डाऊनमध्ये उपाशी राहु नये म्हणुन गेवराई तालुक्यातील आधिकारी व कर्मचारी यांनी एकञ येत त्यांना अन्न धान्य व किराणा किट वाटप सुरू केले. असुन त्यांच्या या उपक्रमाचे सर्वञ कौतुक होत आहे. तालुक्यातील मन्यारवाडी येथील वस्तीवर राहत असलेल्या व ज्यांना शासकिय योजनेचा कोणताही लाभ मिळाला नाही अश्या 14 गरीब गरजवंत कुटुंबाना दि.27 सोमवार रोजी अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले असुन या मध्ये जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी गेवराई न्यायालयाचे न्यायाधिश एखे मँडम, न्यायधिश घुगे, नायब तहसिलदार प्रशांत जाधवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम, पोलिस उपनिरीक्षक टाकसाळ, तलाठी राजेश राठोड यांच्यासह तालुका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. देशात कोरोना आजाराच्या रुपाने मोठी नैसर्गिक आपत्ती आली असुन या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यातील सर्व विभागातील प्रमुख अधिकार्यांनी एकत्र येवून स्वखर्चाने माणुसकीच्या नात्याने गोरगरीब गरजू कुटूंबांना एक महिणा पुरेल एवढा किराणा साहित्याची किट देऊन आधार दिला आहे. या कोरोनाच्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात गरजूंना मदत करत समाजातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पोलीस यांनी मदतीचे हात पुढे केले. दरम्यान दररोज प्राप्त होणार्या मदतीतून गरजूंना किराणा कीटचे वाटप करण्यात येत असून प्रशासनातील अधिकार्यांनी सुरु केलेल्या या मोहिमेंतर्गत आहेर वाहेगांव, मन्यारवाडी येथील गरींबाना मदतीची सुरुवात झाली आहे.
Leave a comment