केज । वार्ताहर
सांगवी येथिल गावकर्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आसल्याचे निदर्शनास आल्यानंतर बीड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई मस्के यांचे पती बाळासाहेब मस्के यांनी स्वखर्चातून पाणी टँकर सुरू करत पाणी टंचाईवर मात केली आहे.
केज तालुक्यातील कित्येक गावातील नागरीकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशीच अवस्था सांगवी येथिल गावकर्यांची झाली होती. घागरभर पाण्यासाठी किलोमिटरवर पायपीट करावी लागत आसून येथिल पाणी प्रश्ण सोडवण्यासाठी कित्येकदा राजकीय पुढार्यांकडे मागणी करण्यात येत होती. माञ पुढार्यांनी याकडे साफ दूर्लक्ष केल्याने गावकर्यांच्या पुरत्या आशाच मावळल्या होत्या. माञ सदरील गावचा पाणी प्रश्ण गंभीर झाल्याचे बीड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ.सविताताई मस्के यांचे पती बाळासाहेब मस्के यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी प्रशासनाची वाट न बगता सांगवीकरांना तात्काळ स्वखर्चातून पाण्याचे टँकर सुरू केले आसून सोमवारी दु.4 वा.त्याचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला प्रसंगी अक्षय केदार, श्रीराम तांदळे, एकुरक्याचे उपसरपंच चंद्रकांत मोरे, मधूकर सांगळे यांची उपस्थित होती. यावेळी पाणीप्रश्न मार्गी लावल्याबद्दल गावकर्यांकडून आभार व्यक्त करण्यात आले.
Leave a comment