किल्ले धारूर । वार्ताहर
धारूर तालुक्यातील चोरांबा येथील शेतकरी सचिन चव्हाण यांनी कोबी या पिकाला भाव मिळत नसल्याने आपल्या शेतातील दोन एकर कोबी वर नांगर फिरवला आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने शेतकरी देखील अडचणीत सापडले आहेत. आलेले पीक फळे भाज्या बाहेर गावी नेता येत नाहीत तसेच तालुक्याच्या ठिकाणी देखील जावून विकता येत नाहीत आलेल्या पिकाला योग्य भाव नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
चोरांबा येथील शेतकरी सचिन चव्हाण यांचा कोबीसाठी तीस हजार रुपये खर्च झाला. त्या प्रमाणात त्यांना भाव मिळाला नाही खर्च जास्त मिळकत कमी होवू लागल्याने त्यांनी नैराश्यातून दोन एकर चांगली आलेल्या कोबी वर नांगर फिरवला आहे. अगोदरच शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यातच कोरोना संकट त्यामुळे बळिराजा पूर्णपणे संकटात सापडला आहे शासनाने शेतकरी यांच्या साठी योग्य नियोजन करून विविध योजना राबविण्याची मागणी धारूर तालुक्यातील शेतकरी संघटना करत आहेत. या शेतकर्याच्या नुकसानीचा तहसील कार्यालयाने पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
Leave a comment