धारुर । वार्ताहार
किल्ले धारूर शहरातील जनरल स्टोअर्समध्ये बर्याच वस्तू ह्या एक्सपायरी रिलेटेड असतात. कॉस्मेटिक वस्तू व इतर वस्तू एक्सपायरी रिलेटेड असलेल्या वस्तू यांच्या तारखा जवळच्या असल्यावर त्या वस्तू भविष्यात आम्हाला विकता येत नाही.त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच काही शालेय विद्यार्थी यांना लागणारे शालेय साहित्य जनरल स्टोअर्स मध्ये असल्याने संबंधितांची मागणी वाढत आहे.
शासकीय नियमाप्रमाणे शिथील काळात आम्हालाही दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी किल्ले धारुर शहरातील जनरल स्टोअर्सचे दुकान मालक सूर्यपाल तोष्णिवाल, राजेश चिद्रवार, सुनिल खिंडरे, अरुण पिलाजी, विलास पाथरकर, सचिन चिद्रवार, नितीन मंत्री, शिवा शेटे, गोविंद शेटे, मुरलीधर कवठेकर, आसाराम बारस्कर यांनी केली आहे.
Leave a comment