जादुटोणा करणार्या महिलेविरुध्द कारवाई करा
केज । वार्ताहर
तालुक्यातील सोनीजवळा परिसरात आदीवासी पिढीवर अवैधरित्या गावठी दारू बनवून त्याची विक्री सुरू असल्याची माहितीवरून युसफवडगाव पोलिसांनी धाड टाकून गावठी दारू व रसायन नष्ठ केल्याचा राग धरून आदिवासी जमातीच्या एका महिलेने चक्क जादूटोणा करून तक्रारदार व काही व्यक्तींच वाटोळे होईल असे म्हणत असलेला व्हिडीओ सर्वत्र पसरला आहे. तसेच आमच्या विरुद्ध तक्रार केली म्हणून समाजातीलच एका कुटुंबाला वाळीत टाकल्याची तक्रार मंडळाधिकारी भागवत पवार यांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे केली आहे.
आदिवासी समाजातील ताई काळे या महिलेने अवैध दारू विरुद्ध तक्रार देणारे व कारवाई करणार्या विरूद्ध जो जादूटोणा सारखे क्रत्य करून दहशत निर्माण केली आहे.ती गंभीर असून समाजातील जात पंचायतचा आधार घेत, तक्रार केली असल्याच्या संशयावरून समाजातील एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार घडला असल्याचीही माहिती मिळाल्याची अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्यकर्ते प्रा. हनुमंत भोसले यांनी निवेदनाद्वारे कळवले असून या महिलेविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी युसफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Leave a comment