माजलगांव । वार्ताहर
सिद्धीविनायक अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव च्यावतीने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर माजलगाव येथे दि.25 एप्रिल शनिवार रोजी भगवान श्री.परशुराम जयंतीदिनी एक हजार मॉस्कचे वाटप केल्यानंतर चिंचाळा (ता.वडवणी) परिसरातील गावांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून ऊस तोडून आलेल्या व त्यांना आपल्याच गावात शेतात क्वॉरंटाइन करण्यात आलेल्या गरीब ऊसतोड मजूरांना, व गरजवंत,निराधार ,अपंग, गोरगरीब अशा 240 नागरिकांना सामाजिक बांधिलकी म्हणून अन्नधान्य किट सिद्धीविनायक अर्बनच्या वतीने वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय देशमुख जेष्ठ संचालक डॉ.प्रकाश पाटील संस्थेचे सचिव निरंजन वाघमारे संस्थेचे संचालक तथा माजलगाव न.प. पाणीपुरवठा सभापती विनायक रत्नपारखी, संचालक गोरख मेंडके, संचालक कैलास जोशी संस्थेचे सल्लागार अनिल गोंडे, राघवेंद्र शिर्षिकर, यांच्यासह सभापती बळीराम बापु आजबे पाटील, सरपंच शिवाजीराव मुंडे, तिगावचे सरपंच पोपटराव शेंडगे, सुरेश जोशी, डॉ.गणेश पाटील, प्रभाकर तांदळे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवशंकर नेमाटे, उदय पाटील, विनय पाटील, दिगांबर वाघमोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
------
Leave a comment