गेवराई । अय्युब बागवान
कोरोनापासून जनतेचा बचाव करण्यासाठी सरकारने लॉकडाऊन करुण संचारबंदी केलेली आहे त्यामुळे शहर व परिसरातील छोटे मोठे उद्योग दुकाने बंद असल्याने गोर गरीब मजूर यांचे हाल होत आहेत, त्यातच रेशनकार्ड नसल्याने अनेक गरीब कुटुंब धान्यापासुन वंचित राहिले आहे,आता काय खावे,मागून ही मिळत नसल्याची तक्रार हे लोक करत आहेत.
लॉकडाऊन होऊन महिना- दिड महिना झाला. गरिबांच्या हाताला काम नसल्याने त्यांची उपसमारी होऊ नये यासाठी मोठे अन्नधान्य देण्याची घोषणा सरकारने केली मात्र हे धान्य रेशनकार्ड धारकांनाच मिळेल त्यामुळे आता रेशनकार्ड नसलेल्याना रेशन मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे,या निर्णयाने अनेक हजारो कुटुंब अन्नधान्या पासून वंचित राहिले असून आता काय खावे,?मागूनही मिळत नाही अशी अवस्था गरीबांची झाली आहे. या बाबत पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार अशोक भंडारी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की सध्या रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानातून ठरवून दिलेला गहु आणि तांदूळ यांचे वितरण झाले आहे, रेशंकार्ड नसलेल्या कुटुंबाची माहिती जमा करुण त्यांची रितसर यादी मान्यते साठी पाठवली आहे,लवकरच त्यावर सरकार दरबारी निर्णय होईल त्यानंतर त्यांना शासन आदेशानुसार अन्नधान्य वाटप केले जाईल.
शासनामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत शिधापत्रिका धारक लाभार्थिना सार्वजानिक वितरणव्यवस्था अंतर्गत दरमहा वितरित करण्यात येते.धान्यासह अप्रैल, मे व जून या तीन महिन्याच्या कालावधीत दरमाहा प्रत्येक लाभार्थीला 5 किलो प्रमाणे मोफत तांदूळ वितरित करण्यात येत आहे,या सोबत केसरी शिधापत्रिका धारक एपीएल लाभार्थिन्ना देखील मे वे जून या दोन महिन्याच्या कालावधीत सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यात येणार आहेत .परंतु अनेक गरीब मजूर कुटूंबाकडे शिधापत्रिका नाहीत.लॉकडाउनच्या स्थितरीत हाताला काम नाही आणि शिधापत्रिका नसल्याने रस्तभाव दुकानामधून धान्य मिळत नाही.त्यामुळे हातावर पोट असलेल्या गरीब कुटुंबासमोर उपसमारीचे संकट निर्माण झाले आहे.
पात्र लाभार्थी कुटुंबाना धान्य वितरित करणार-आ.पवार
शिधापत्रिका नाही अशा कुटुंबाची माहिती घेण्याची सूचना तहसीलदार यांना केलेली आहे.शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबाना आधी धान्याचे वाटप करुण त्यांची खान्यापिण्याची सोय केली जाईल नंतर त्यांना शिधापत्रिका उपलब्ध करुण पात्र लाभार्थी कुटुंबाना धान्य वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती आ. लक्ष्मण पवार यांनी दिली.
Leave a comment