बीड । वार्ताहर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे स्वच्छता ठेवणे संपर्क टाळणे आधिसुचना आरोग्य विभागाकडून सुचवण्यात आले आहेत शहरात असणार्या गोरगरीब लोकांना न.प. च्या माध्यमातून 10 हजार मास्क ते वाटप करण्याचा निर्णय नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी घेतला होता त्यानंतर काही भागांमध्ये अधिकचे लोक असल्याचे निदर्शनास येतात 20 हजार मास्क हे वाटप करावे अशी सूचना नगराध्यक्षांनी केल्यानंतर बचत गटांच्या माध्यमातून मास्क वाटप करण्यात सुरुवात झाली आहे.
राज्यात कोरोनाते संकट दिवसागणिक वाढत आहे या संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक जण आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे या रोगापासून संरक्षण व्हावे यासाठी बीड नगरपालिकेच्या वतीने शहरातील गरीब व गरजूंना मोफत मास्क वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला नगर परिषद अंतर्गत गणेश महिला बचत गट तुळजाभवानी महिला बचत गट या महिलांनी वीस हजार कापडी मास्क तयार करून गरीब व गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे माहिदा महिला बचत गट, मन्मथ स्वामी महिला बचत गट स्वामी समर्थ महिला बचत गट, अण्णाभाऊ साठे महिला बचत गट, सावित्रीबाई फुले महिला बचत गट, राधेश्याम महिला बचत गट, तक्षशिला महिला बचत गट, यांनी मास्टर वाटप करून जनजागृती साठी सहभाग नोंदवला आहे या बचत गटामार्फत शहरातील पंचशील नगर खासबाग गांधिनगर स्वराज्य नगर शाहूनगर बार्शी नाका खंडेश्वरी अंकुश नगर बालेपीर आदी भागात मास्क चे वाटप करण्यात आले नगरपालिकेच्या वतीने सुरवातीला दहा हजार मस्त वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी 20 हजार वाटप करावे अशी सूचना केली उद्दिष्टा पैकी डबल मास्टर वाटप झाले असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर रस्त्यावर उतरून नपच्या कामावर नियंत्रण ठेवत आहेत मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजच्या कामाचा रोजच आढावा घेऊन शहरात नाली सफाई स्वच्छतेची कामे याकडे लक्ष देत असून हवेत असणार्यांनी कधीतरी रस्त्यावर उतरणे आणि कांगावा करणे यापेक्षा कायम रस्त्यावर असणार्या नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या कार्यावर काही महाभाग आरोप करू लागले आहेत खात्री न करता केलेल्या आरोपावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आव्हान करण्यात येत आहे.
Leave a comment