बीड । वार्ताहर
बीड शहरातील तहसील कार्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये अवैधरित्या केलेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन सानप यास एक लाख रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.21) दुपारी बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. या कारवाईने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.
अवैधरित्या केलेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन सानप याने तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र नंतर तडजोड करत दीड लाखांची लाच स्विकारण्याचे मान्य करत त्यातील 1 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना त्यास बुधवारी (दि.21) दुपारी बीड लाचलुचपच प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.
बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
Leave a comment