बीड । वार्ताहर

दीनदयाल शोध संस्थान संचलित, गोकुळ शिशुवाटिकेत वृक्षाला राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. भारतीय संस्कृतीत प्रमुख सणांमध्ये रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या स्नेह व अतूट बंधनाचा सण म्हणून साजरा केला जातो. हे वर्ष पर्यावरण पूरक वर्ष म्हणून राबवले जात आहे. त्या निमित्ताने झाडाला राखी बांधण्यात आली व विद्यार्थ्यांना झाडाची पाने फुले तसेच कागदाच्या पेपरपासून राखी तयार करणे हा एक अनोखा उपक्रम घेतला.

सर्वप्रथम सर्व गटातील मुलांना गोकुळ शिशुवाटिका प्रमुख  सौ स्नेहलताई देशपांडे यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले. व वृक्षाला राखी बांधून राखी पौर्णिमेला सुरुवात केली. त्यानंतर मुलांना व मुलींना कुंकू लावून औक्षवण करण्यात आले. व मुलगा व मुलगी हा भेदभाव न ठेवता मुलांनी मुलींना व मुलींनी मुलांना राख्या बांधण्यात आल्या.  मुलांनी मुलींना वेगवेगळे खाऊ व भेटवस्तू दिल्या. त्यामध्ये स्वच्छंद गटातील देवांश लोमटेच्या पालकांनी स्वइच्छेने सर्व मुलांसाठी खाऊ दिला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.