स्व.विनायक मेटे यांनी समाजासाठी अनेक कष्ट सोसले-संजय महाराज पाचपोर

बीड । वार्ताहर

 


लोकनेते विनायकराव मेटे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी दिवंगत विनायकराव मेटे यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थित भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले, अनेकांना आपल्या अश्रूचे बांध आवरता आले नाही. यावेळी आशीर्वाद मंगल कार्यालय येथे त्यांच्या स्मृती प्रत्यार्थ ज्ञानोबा, तुकोबा पुरस्कार प्राप्त ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांनी जनतेचा विचार केला, त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सभागृहात मांडले समाजासाठी त्यांनी अनेक कष्ट सोसले आणि जो पायंडा त्यांनी घातला तो पुढे देखील शिवसंग्रामच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढे न्यावा असे यावेळी  पाचपोर महाराज म्हणाले.

 


14 ऑगस्ट 2022 रोजी मराठा आरक्षण बैठकीसाठी मुंबईला जात असताना मुंबई- पुणे महामार्गावर लोकनेते विनायकराव मेटे यांच्या गाडीला अपघात होऊन त्यात त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेने बीड जिल्हाच न्हवे तर अख्या महाराष्ट्रावर शोककाळा पसरली होती. राजेगाव सारख्या एका खेड्यात जन्म घेऊन ते सलग पाच वेळा विधानपरिषद सदस्य अशी कारकीर्द असणार्‍या लोकनेत्याचे असे अकाली जाण्याने विस्थापितांची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांचे हे द्वितीय पुण्यस्मरण या निमित्ताने अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला सकाळपासूनच त्यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी जनसमुदाय लोटला होता. अनेकांना त्यांना अभिवादन करताना गहिवरून आले स्व.विनायकराव मेटे यांनी त्यांच्या हयातीमध्ये अनेक गरजू, गोरगरीब ,शेतकरी यांना मदतीचा हात दिला होता त्यांच्या अचानक जाण्याने आता आपला पाठीराखा हरवल्याची भावना यावेळी व्यक्त होत होती.

स्व.विनायकराव मेटे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त महंताची उपस्थिती

संजय पाचपोर महाराज यांच्या कीर्तनावेळी श्री.क्षेत्र नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज, लक्ष्मण महाराज मागडे ,नवनाथ महाराज,योगीराज महाराज रामगडकर, हरिदास भाऊ जोगदंड, नाना महाराज कदम, सुरेश महाराज जाधव,नवनाथ महाराज जरूर,भेलेश्वर संस्थानचे तुकाराम महाराज, सिताताई आव्हाड,बंडू महाराज जटाळ, मटकर महाराज,गोविंद महाराज नाईकवाडे ,भागवत महाराज,या महंतांनी हजेरी लावली. आणि लोकनेते विनायकराव मेटे यांच्या प्रति आपली आत्मीयता व्यक्त केली.या प्रसंगी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर देखील उपस्थित होते.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.