बीड / वार्ताहर

 

ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या माध्यमातून ठेविदारांना अधिकच्या व्याजाचे अमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या रकमा परत न केल्याप्रकरणी मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे व त्यांच्या संचालक मंडळाविरुद्ध जिल्ह्यात 41 गुन्हे दाखल झालेले असताना आता सक्त वसुली संचनालयाकडून बीडसह छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानराधाच्या कार्यालयांची झाडाझडती करत काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

 

 बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तपास करत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेने सुरेश कुटे व संचालक आशिष पाटोदेकर यांना यापूर्वी ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्या राज्यभरातील ठिकठिकाणीच्या मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही सुरू केल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिलेली आहे.

 

 

दि.९ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास कुटे यांच्या बीड, छत्रपती संभाजीनगर येथील घर, दुकान, फॅक्ट्री व इतर मालमत्तावर व संचालक मंडळातील कुलकर्णी, आमटे यांच्या घरी सक्त वसुली संचनालयाकडून अर्थात ईडीने छापे घातले आहेत.सुरेश कुटे यांना व आशिष पाटोदेकर यांना अटक झाल्यानंतर त्याची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरु झाली होती. दरम्यान आतापर्यंत कुटे विरोधात ठेवीदारांना आकर्षक व्याजदर देऊन त्यांच्या ठेवी परत न केल्याप्रकरणी फसवणूक केल्याचे 41 गुन्हे दाखल झाले आहेत. असे असतानाच ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून बीड येथील हिरालाल चौक भागातील राधा क्लॉथ सेंटर, एम आयडीसी येथील फॅक्ट्री, गोदाम तसेच घर आणि छत्रपती संभाजीनगर येथील फॅक्ट्री सील केली असल्याची माहिती मिळत आहेत. 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.