बीड | वार्ताहर
चोरी करून कारमधून जाणाऱ्या चोरांचा संशय आल्याने त्यांना पकडायला गेलेल्या चोरांनी पोलीस कर्मचारी व इतर दोघांवर दगडफेक केली. ही घटना शहरानजीक धुळे-सोलापूर महामार्गावर खजाना बावडीजवळ आज गुरुवारी पहाटे साडेबाराच्या सुमारास घडली.यात कोणीही गंभीर जखमी झाले नसून चोरटे मात्र कार सोडून पळून गेले.
चोरीच्या घटनावर आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलीस गस्तीवर असतात. पहाटे १२. ३० च्या सुमारास पोलीस कर्मचारी संघर्ष गोरे, पोलीस कर्मचारी सचिन जायभाये,शमो शेख व अकिब खान घराकडे जात असताना पेंडगाव जवळ त्यांना एका टाटासुमो कारमध्ये चार ते पाच जण संशयित आढळून आले.
यावेळी कारमध्ये असणाऱ्या संशयिताकडे चोरीचे साहित्य असू शकते हे ओळखून पोलिसांनी कारचा पाठलाग सुरु केला.मात्र चोरट्यांनी कार खजाना बावडी इजिक सोडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत पलायन केले. यावेळी गाडीत टपरीतील गुटखा बिस्किट पुड्यासह इतर साहित्य आढळून आले आहे. चोरी करून चोरटे पुढे जात असल्याचा अंदाज पोलिसातून वर्तविला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Leave a comment