बीड । वार्ताहर
शहरातील धानोरा रोड परिसरात एका नालीत मृत अर्भक सापडल्याची चर्चा शनिवारी दुपारी झाली अन् एकच खळबळ उडाली. मात्र पोलीसांनी घटनास्थळी दाखल होवून ते जिल्हा रुग्णालयाच तपासणीसाठी नेले असता ते असल्याचे प्राण्यांचे अवयव असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी याची स्पष्टोक्ती दिली.
बीड शहरातील बशीरगंज भागात मृत अर्भक सापडल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी (दि.13) दुपारी 4 वाजेच्या सुमारास शहरातील गोविंदनगर भागात नवजात मृत अर्भक नालीमध्ये आढळून आल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी दिल्यानंतर शिवाजीनगर ठाण्यातील पोलीस अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी हे अर्भक ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सत्य माहिती समोर आली आहे. ते मानवी अर्भक नसून कोणत्यातरी प्राण्याचे अवयव आहेत, असा अहवाल जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला आहे.
काय म्हणाले डॉक्टर?
धानोरा रोड, पंढरी परिसरात नालीमध्ये मानवी मृत अर्भक समजून पोलीस पत्र घेवून जिल्हा रुग्णालयात आले होते. याबाबत एका नागरिकाने तक्रार करत ते मानवी मृत अर्भक असल्याचे कळवले होते. त्यानुसार पोलीसांनी नालीमध्ये जे अवशेष सापडले होते, ते तपासण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आणले होते, मात्र तपासणीअंती ते मानवी अर्भक नसून इतर प्राण्यांचे अवयव असल्याचे स्पष्ट झाले असल्याचा अहवाल पोलीसांना दिला आहे अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉ. श्री लोध यांनी दिली.
Leave a comment