बीड । वार्ताहर
गेवराई तालुक्यातील आहेर वडगाव शिवारातील गट नंबर 55 मध्ये महसूल विभागाने जप्त करुन ठेवलेला 120 ब्रास वाळू साठा अज्ञाताने चोरून नेला. ही घटना 3 ते 4 जुलैच्या दरम्यान घडली.
चोरी झालेल्या वाळूची किंमत 72 हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी पाडळसिंगी सज्जाचे तलाठी अविनाश लांडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a comment