बीड । सुशील देशमुख
‘देव द्यायला लागला,अन् पदर नाही घ्यायला’ अशी म्हण ग्रामीण भागात सातत्याने बोलली जाते. तशीच प्रचिती बीड जिल्ह्यात आली आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, सततचा पाऊस व अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याने शासनाकडून प्रचलित नियमानुसार मदत, अनुदान शेतकर्यांना दिले जाते. परंतु बीड जिल्ह्यातील तब्बल 72 हजार 410 शेतकर्यांनी विशिष्ट क्रमांक (व्हीके नंबरने) केवायसी न केल्यामुळे त्यांना शासनाकडून मंजूर झालेले जवळपास 45 कोटींच्या अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे.
जिल्ह्यात सप्टेबर, ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे झालेले शेतपिकांचे नुकसान आणि मार्च, एप्रिल 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे व दुष्काळ 2023 मध्ये झालेले शेतीपिकांचे नुकसानापोटी बीड जिल्ह्यातील 964804 बाधित शेतकरी लाभार्थ्यांना रुपये 717.09 कोटी अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानाचे संगणकीय प्रणालीमार्फत शेतकर्यांच्या बँक खात्यात निधी वितरण सुरू आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 6 लाख 82 हजार 812 शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रुपये 568.52 कोटी अनुदानाचे वितरण झाले असून उर्वरित 281992 शेतकरी लाभार्थ्यांपैकी 1 लाख 1 हजार 196 लाभार्थ्यांच्या माहिती सबंधी दुरुस्ती करण्यासाठी संबंधित शेतकर्यांनी आधार सेंटरवर जाऊन बी अॅक्टिव्ह करून घेणे व बँक खात्यास आधार मॅपिंग करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सद्यस्थितीमध्ये 1 लाख 80 हजार 796 लाभार्थ्यांपैकी 72410 लाभार्थ्यांनी ग्राम स्तरावर प्रसिद्ध झालेल्या विशिष्ट क्रमांक यादी लिस्ट मधील अनुक्रमांकनुसार आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र येथे आधार प्रणाणीकरण (ई-केवायसी) करणे आवश्यक आहे. याची तालुका निहाय आकडेवारी खालील प्रमाणे आहे. खालील प्रमाणे शेतकरी यांनी (तज्ञ नंबर) नुसार आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र येथे आधार प्रमाणीकरण (ई केवायसी) तात्काळ करून घेणे आवश्यक आहे.
दुष्काळाच्या अनुदानापासून 11,089 शेतकरी वंचित
वडवणी, अंबाजोगाई व धारुर या तीन तालुक्यातील 11 हजार 089 शेतकरी हे सन 2023 मधील दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. शेतकरी लाभार्थ्यांनी आपली माहिती (आधार कार्ड व बॅक पासबुकची प्रत) संबंधित गावचे ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी बीड यांनी केले आहे.
Leave a comment