वरुणराजा प्रसन्न; मृग नक्षत्रात पेरण्यांना सुरुवात;जिल्ह्यात 24 तासात 18.7 मिलीमीटर पाऊस
बीड । सुशील देशमुख / News by Sushil Deshmukh
दुष्काळाचा सामना करणार्या बीड जिल्ह्यात यंदा वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. मृग नक्षत्रापूर्वीपासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे 7 जूनच्या मृग नक्षत्रात खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. दि. 17 जून रोजी मागील चोवीस तासात 11 जून रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण 18.7 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. यात माजलगाव महसूल मंडळात अतिवृष्टीची (76 मि.मी.) नोंद झाली आहे. तर परळी महसूल मंडळातही 57.5 मि.मी. पाऊस झाला.(visit us:- www.lokprashna.com)
1 जूनपासून 17 जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण 151.8 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून वार्षीक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण 26.8 टक्के इतके आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद शिरुरकासार तालुक्यात (186 मिलीमीटर) झाली आहे तर वडवणी तालुक्यात सर्वात कमी (93.9 मि.मी) पाऊस झाला आहे. बीड तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी 594.5 मिमी आहे तर पाटोदा तालुक्याची 538.7 मि.मी.इतकी वार्षिक सरासरी आहे.(visit us:- www.lokprashna.com)आष्टी-546.1, गेवराई-587, माजलगाव-616.9, अंबाजोगाई 632.4, केज-583.6, परळी 628.1, धारुर-669.8, वडवणी-600.7 तर शिरुरकासार तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी 515.6 मिलीमीटर इतकी आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 566.1 मिलीमीटर इतका पाऊस पडतो.
पावसाची संततधार कायम असल्याने जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतकर्यांनी कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन वेळेतच होणार असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकरी आता खरीप पिकांची पेरणी करण्याच्या तयारीला लागला आहे.(visit us:- www.lokprashna.com)आगामी काही दिवस पावसाचा जोर वाढल्यान यंदा शेतकरी वेळेत पेरणीची कामे उरकून घेतील. 12 जूनपर्यंत जिल्ह्यात 5 टक्के खरीप पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. यंदा सोयाबीनच्या तुलनेत कापूस लागवड वाढल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून लक्षात येते.
गतवर्षी बीड जिल्ह्यात पावसाअभागी दुष्काळीस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे खरीप हंगामात महागडे व नामांकित कंपन्यांचे बियाणे, आणि खते वापरुनही पिकांची वाढ झाली नव्हती. त्याचा मोठा फटका बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना बसला होता..(visit us:- www.lokprashna.com)या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यात यंदा सुरुवातीलाच पावसाने चांगले आगमन केल्याने शेतकर्यांत आनंदाचे वातावरण आहे. मृग नक्षत्रात पेरणी करण्यावर शेतकर्यांचा भर असतो. त्यामुळे आणखी दोन-तीन मोठे पाऊस झाल्यास शेतकरी कापूस लागवडीसह सोयाबीन, मका, तूर पेरणीसाठी गती घेणार आहेत. शेतकर्यांनी खरीप हंगामासाठी शेतीची पूर्व मशागत करुन ठेवलेली आहे. यंदा जिल्ह्यात 8 लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रावर खरिप पीकांची लागवड होणार आहे. (visit us:- www.lokprashna.com)
Leave a comment