वडवणी । वार्ताहर
येथील गजानन जिनिंग समोर उभा केलेला दोन ट्रॉली असलेला ट्रॅक्टर अज्ञाताने चोरून नेला. ही घटना 18 मार्चच्या पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दत्ता लक्ष्मण गायकवाड (रा.वडवणी) यांनी याबाबत तक्रार नोंदवली. ते ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतात. 17 मार्च रोजी सकाळी 8 ते 18 मार्चच्या पहाटे 2 वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांचा ट्रॅक्टर क्र.(एम.एच.44 -0831) हा वडवणी येथील गजानन जिनिंगसमोर उभा केलेला होता. सात लाख रुपये किमतीचा हा ट्रॅक्टर अज्ञाताने चोरून नेला. याप्रकरणी दत्ता गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Leave a comment