नवी दिल्ली | वृत्तसेवा

 

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रसह, कर्नाटक, हरियाणा या राज्यातील उमेदवारांचा समावेश आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या ऐवजी त्यांच्या भगिनी तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच नागपूर मधून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज जाहीर झालेल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना भाजपने तिकीट दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच सहा विद्यमान खासदारांचे पत्ते कट करण्यात आले आहेत.

 

 

लोकसभा निवडणुकीसाठी अखेर भाजपने बीडमधील उमेदवार बदलला आहे.विद्यमान खा. प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी भाजपने माजी मंत्री असलेल्या त्यांच्या बहीण पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली, यात नितीन गडकरी (नागपूर ) यांच्यासह बीडमधून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असेल यावरून तर्कवितर्क लढवले जात होते.भाजप आपला उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र पंकजा मुंडे या लोकसभेसाठी फारशा इच्छुक नव्हत्या. मात्र अखेर आता त्यांच्याच गळ्यात बीड लोकसभेची उमेदवारी टाकण्यात आली आहे.भाजपने महाराष्ट्रातील २० जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. आज जाहीर झालेल्या यादीनंतर आता राज्यातील भाजपचे हे दिग्गज नेते लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागणार आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.