नाटकाला झी नाट्य गौरवची चार नामांकने
बीड । वार्ताहर
‘आण्णांच्या शेवटच्या ईच्छा.!’ या मराठवाडी बोलीभाषेतील नाटकाला झी नाट्य गौरव 2024 ची चार नामांकने मिळाली आहेत. या नाटकाचे लेखक दिग्दर्शक, विजयकुमार बंडुराव राख यांचे बीड तालुक्यातील वंजारवाडी हे गाव असून ते वंजारवाडीत वास्तव्यास आहेत. त्यांनी आजवर अनेक नाटकांचे लेखन व दिग्दर्शन केलेले आहे. सिनेमाची पटकथा आणि संवाद लेखन केलेले आहे. मुंबई विद्यापीठात एमटीएचे शिक्षण पूर्ण करून, नाटक विषयात नेट उत्तीर्ण होवून ते बीड येथील सौ.के.एस.के. महाविद्यालयात, नाट्यशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत.
ग्रामीण विद्यार्थ्यांना घेवून त्यांनी नाट्यशास्त्र विभागात अनेक नाट्यकृती केलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांत मराठी रंगभूमीवर मनश्री आर्ट्स मुंबई, निर्मित आणि विजयकुमार राख लिखित दिग्दर्शित आण्णांच्या शेवटच्या ईच्छा...! या नाटकाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या नाटकाला आजवरच्या प्रयोगांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. कमी काळात रसिक प्रेक्षकांनी हे नाटक डोक्यावर घेतले. नुकत्याच पार पडलेल्या झी नाट्य गौरव 2024. प्रायोगिक नाटकाची चार नामांकने मिळाली आहेत. यामध्ये सर्वोतकृष्ट लेखन:- विजयकुमार राख, सर्वोत्कृष्ट संगीत :-प्रविण - गोविंद, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता:- सोमनाथ लिंबरकर , सर्वोतकृष्ट सहाय्यक अभिनेत्री:- अमृता श्रीगोंदेकर. अशी नामांकने मिळाली आहेत. दि. 6 मार्च . 2024 रोजी झी कडून हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
Leave a comment