बीड । संपतलाल कोटेचा

 

थोडा ही लहाणाकाळ अल्पता ही आपल्या आयुष्याला नसते. मात्र  त्या आयुष्याचे मर्म समजून घेण्याला त्याचा उपभोग घेण्यासाठी उशिराने सुरुवात होते. तोपर्यंत आपले आयुष्य हे संपुष्टात आलेले असते व आपणास त्यापासून दुरावले जाते. परंतु आयुष्य जगण्याला जे काही मार्ग असतात  त्या पैकी आयुष्याचा उद्धार करण्याला आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय गाठण्याला संकल्प एकच पुरेसा असतो .त्यासाठी सखोल विचारांती  योग्य ठिकाणी माणूस आपल्या जीवनाचा उद्धार करत असतो. या कार्याला प्रभाव नाही तर वैराग्याची स्थिरता लाभते. अशीच स्थिरता वैराग्याची भावना आपल्या शहरातील आजचे प्रख्यात संत प.पु. तीर्थेश ऋषी म.सा. अर्थात तीर्थेश कैलासजी तातेड यांना लाभली. प.पु. सुनंदा जी महाराज यांचा 2003 या वर्षात बीडला चतुर्मास होता. त्यांच्या उपदेशाने तीर्थेशजी यांनाही उपरती होऊन संसार नश्वर वाटू लागला. व शाश्वत जीवन जगण्यासाठी दीक्षा घेण्याचा वैराग्यातून मनी भाव उद्भवला .व तशी त्यांनी आपल्या माता पित्याकडे संसाराचा त्याग करून संन्यस्त होण्याचा विचार मांडला. परंतु दोन बहिणीवर एकुलता एक भाऊ असल्याने आणि करता कमवता तो एकटाच असल्यामुळे घरातून त्यासाठी विरोध होऊ लागला.  

 

त्यावेळी ते आपली छोटीशी किराणा दुकान पाहून बँकेच्या पिग्मी चे काम करीत होते. व आपल्या पित्याला साथ देऊन प्रपंचाचा भार ओडत होते. मात्र जीवन म्हणजे काय? याचे विचार करता त्यांनी सांगितले  स्वतः स्वतःलाच फोन लावून बघा तो लागत नाही तो व्यस्त दाखवतो. जगात आपल्याकडे सगळ्यासाठी वेळ आहे. पण स्वतःसाठी मात्र आपण व्यस्त असतो. म्हणून स्वतःला वेळ देण्यासाठी आपल्या स्वतःचे आयुष्य आनंदाने  उद्धारीत करण्यासाठी मला परवानगी द्या! असे म्हणून ते मनाचा ठाम निर्धार करून संता सोबत अभ्यास करण्यासाठी उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषीजी यांच्या सानिध्यात जोडले गेले. 2003 पासून 2009 पर्यंत त्यांच्या परिवर्तनाची आशा वाटून त्यांना परवानगी दिली नाही .मात्र त्यांचा ठाम निर्धार पाहून 2009 च्या फेब्रुवारी महिना अखेर मार्च आरंभी एक तारखेला त्यांना सन्यस्त होण्यास परवानगी मिळाली व ते गंगाधाम पुणे येथे प.पु्.तीर्थेषॠषी म्हणून प.पु.उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषीजी महाराजाच्या सानिध्यात सन्यस्त महाराज बनले.

 

उग्र तपस्वी ज्ञानी संताच्या सहवासात तो चातुर्मास पुण्याला केला व 2011 ला होळी चातुर्मासासाठी बीडला  आले. तेथून ते दक्षिण भारतात सिकंदराबाद व चेन्नई चातुर्मास करून आपले महत्त्व वाढवून परत 2013 ला दीर्घ प्रवास करून लोकाग्रहास्तव महाराष्ट्राकडे आले व बीडला परत एक वार होळी चातुर्मासात उपस्थिती लावली .त्यावेळी बिडकर श्रावकानी त्यांचा बहुमान केला व त्यांना चंपावती रत्न ही पदवी प्रदान केली .तेथून महाराष्ट्रात काही वर्षं चातुर्मास करून ते धर्मप्रसारार्थ परमपूज्य प्रवीण ऋषी महाराज साहेबांसोबत उत्तर भारतात मध्य प्रदेशातील इंदोर शहरात त्यांनी वर्षावास केला. पुढील वर्षी राजस्थानच्या जोधपुर शहरात चतुर्मास करून गतवर्षी छत्तीसगडच्या रायपूर शहरांमध्ये चातुर्मास करून परत महाराष्ट्रात 2024 वर्षासाठी औरंगाबादला येत आहेत या कालावधीत त्यांनी खडतर अशी उग्र तपस्या धारण केलेली आहे  भर उन्हात दुपारी बारा ते दोन केवळ अंगावरील एक छोटेसे उपरणे (चोलपट्टा) ठेवून कडक उन्हाच्या पार्‍यात त्यांची तपस्या चालू आहे. एक दिवस उपवास आणि एक दिवस पारणे याप्रमाणे वर्षी तप केले आहे. तर स्थूल देहाला संयमीत ठेवण्यासाठी जमिनीला पाठ न लावता निद्रा घेणे या तपा सह संध्याकाळी ध्यान धारणेतून ध्यानस्थ होणे या क्रियेने त्यांची दिनचर्या चालू आहे. आज त्यांना तेलगू ,तामीळ, कन्नड, राजस्थानी व हिंदी भाषेचे ज्ञान अवगत झाले आहे .मधुर गायक म्हणून त्यांची ख्याती आहे. आपल्या कार्यातून ते आज नावलौकिकास पात्र ठरले आहेत .आपल्या परिवारासह आपल्या शहराची त्यांच्या रूपाने नाव होणार यात शंका नाही अशा महान संताच्या दीक्षा दिनावर त्यांना त्रिवार वंदना
--------------------

बीड के भूमिपुत्र जैन समाज की आन बान शान बाल ब्रह्मचारी प.पु. तीर्थेशऋषिजी महाराज साहब के दीक्षा को 15 साल पूरे हुए हैं। आज उनका दीक्षा दिन है। बीड़ के महानुभव श्रावकोने अभी तक बीड में बाल ब्रह्मचारी प.पु. तीर्थेशऋषिजी महाराज साहब का चातुर्मास बीड में लिया ही नहीं है। और उनके परिवार की इच्छा है कि उनके सांसारिक माता-पिता तक थक चुके है। उनके आंखों के सामने उनका चातुर्मास बीड में हुआवेई.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.