बीड । वार्ताहर

 

 

गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीत जनावरे चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. या पोलीस ठाणे हद्दीतील एका शेताखाड्यावर शेतकर्‍याने बांधलेली गाय आणि एक खिलार बैल चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 25 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास चोपड्याची वाडी शिवारातील गावकरी आखाड्यावर घडली.

 

 

 

या प्रकरणी बालासाहेब बळीराम कोळेकर या शेतकर्‍याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध 28 फेब्रुवारी रोजी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीला गेलेल्या गाय व खिलार बैलाची किंमत 80 हजार रुपये इतकी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

 

 

दरम्यान दुसर्‍या एका घटनेत गेवराई तालुक्यातील गारमाळ देवपिंप्री शिवारातील गट नं. 219 मध्ये चोरट्यांनी एका शेतकर्‍याच्या शेतातील विहिरीवर बसवलेल्या सोलार पंपाच्या मोटारीचे केबल आणि एक विद्युत पंप चोरून नेला 25 फेब्रुवारी रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी छाया सुखदेव पारखे (रा.देवपिंपरी ता. गेवराई) यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.