आहेरवडगाव शाळेला स्व:खर्चातून बोअर घेवून देण्याचा दिला शब्द

बीड । वार्ताहर

 

माध्यमिक विद्यालय आहेर वडगाव ही अतिशय दुर्गम  आणि डोंगराळ भागातील शाळा आहे.शाळेतील विद्यार्थी जरी ग्रामीण भागातील असले तरी त्यांनी खुप कौशल्याने विज्ञानाचे प्रयोग सादर करत त्याबद्दल माहिती सांगितली.विज्ञान प्रयोगाच्या सादरीकरणातून या विद्यार्थ्यांनी स्वत:ला सिध्द केले असे प्रतिपादन व्यापारी महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष सोहनी यांनी केले. तसेच यावेळी संतोष सोहनी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे करत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव म्हणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्याचा शब्द दिला. शाळेला पाण्याची असणारी कमतरता पाहून शाळेला पाण्यासाठी बोअर घेऊन देण्याचा शब्द दिला.

बीड तालुक्यातील आहेरवडगाव माध्यमिक विद्यालय 28 फेब्रुवारी रोजी भव्य विज्ञान प्रदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष सोहनी यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी या विज्ञान प्रदर्शनातील  सर्व विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयोगाची व्यवस्थित पाहणी करून वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल उत्सुकतेने विचारपूस करत सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केले. या प्रसंगी संतोष सोहनी यांचे सर्व विद्यालयातर्फे  शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.त्याचबरोबर पाटोदा नगरपंचायतीचे डेप्युटी सीईओ पी.एस.मस्के यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्याक जाधव सर, शेख सर,सावंत, रांजवन सर, नखाते या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी विज्ञान विषयाच्या शिक्षिका श्रीमती गायकवाड मॅडम यांनी विशेष योगदान दिले त्यांना श्रीमती खामकर मॅडम आणि जायभाये यांनी सहकार्य केले.
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.