बीड । वार्ताहर
राज्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनानंतर मराठा-ओबीसी वाद मोठया प्रमाणात राजकीय पटलावर दिसून येत आहे. अशातच अजित पवारांकडे भुजबळ यांच्यासारखा मोठा ओबीसी चेहरा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मराठा आरक्षणातील निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना मराठा समाज त्यांच्याबाबत सकारात्मक आहे मात्र भाजपाकडे ना कडवा मराठा समाजाचा चेहरा आहे ना ओबीसी चेहरा. स्व.गोपीनाथ मुंडे हे भाजपाचा ओबीसी चेहराच होते त्यांनीच राज्याच्या राजकारणात माधव हे समीकरण रुजवले. पंकजा मुंडेंनीही त्यांच्या पश्चात संघर्ष यात्रा काढून माधव समीकरण आणखीन मजबूत करण्याचा प्रयत्न केला. गत विधानसभेत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे राजकीय सत्तेच्या प्रवाहाच्या बाहेर राहिल्यानंतर त्यांची नाराजी लपली नाही मात्र त्यांनी पक्षश्रेष्ठीवर कधी थेट टिका केली नाही. पक्ष सोडण्याच्या चर्चेलाही स्वतःहून पुर्ण विराम दिला. आता राज्यात भाजपाला ओबीसी चेहर्‍याची गरज आहे. अशावेळी भाजपाला ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठविणे म्हणजेच सत्तेच्या प्रवाहात आणणे क्रमप्राप्त झाले आहे.

शरद पवार मागच्या लोकसभेत सुजय विखेंच्या तिकिटाच्या प्रश्नावर दुसर्‍यांच्या नातवाला मी का पाहून असं म्हणाले होते. भाजपने मात्र याच विधानाच्या बरोबर विरोधातली कृती केली आहे. म्हणजे आपल्याच पक्षातल्या पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले नाहीत पण दुसर्‍या पक्षातल्या म्हणजे राष्ट्रवादीतल्या अजित पवारांची नाराजी मात्र त्यांनी दूर केली त्यानंतर सुद्धा पंकजा मुंडेंच्या चर्चा या होत्या;पण आता मात्र पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवला जाईल याबाबत निश्चितता झाली आहे असं बोललं जाते. पंकजा मुंडे राज्यसभेवर प्रीतम मुंडे बीडच्या लोकसभेवर आणि धनंजय मुंडे परळीच्या विधानसभेवर असं समीकरण साध्य करून भाजपच्या नेत्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप पंकजा मुंडेंची नाराजी आता तरी दूर करेल का की पुन्हा एकदा अंतर्गत राजकारणाला बळी म्हणून पंकजा मुंडेंचा उल्लेख केला जाईल का? अशीही एका बाजूने चर्चा होत आहे मात्र, आता तसं होणार नाही यावेळी नक्कीच पंकजा मुंडेंना भाजप राज्यसभेवर पाठवेल असच बोलले जाते त्यासाठी काही महत्त्वाची कारणं देखील सांगितली जातात. सध्या ताणले गेलेले मराठा ओबीसींच राजकारण अर्थात या राजकारणामुळे शिंदेंच्या शिवसेनेमागे मराठा मतदार उभा राहू शकतो असे बोलले जातात विशेषतः मराठवाड्यातल्या मराठा मतदारांमध्ये एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटलांच्या त्यांनी मागण्याची पूर्तता केल्याने ते लोकप्रिय ठरताना दिसतात याच कृतीमुळे ओबीसी समाज मात्र एकनाथ शिंदेंवरती नाराज आहे असे चित्र दिसत आहे.

ओबीसी नाराज झाले तर भाजपच्या मूळ माधव फॅक्टरला मोठा फटका बसू शकतो हेच राजकारण बॅलन्स करण्यासाठी देवेंद्र फडणवीस ओबीसी मतदारांना सातत्याने विश्वास देण्याचा प्रयत्न करतात ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे ठामपणे सांगतात. मात्र असे असले तरी ओबीसी भाजपामध्ये जातीलच असेही सांगता येत नाही. कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे छगन भुजबळ यांच्यासारखा आक्रमक ओबीसी नेता आहे त्यामुळे ओबीसी त्यांच्या पाठीमागे जाईल परंतू भाजपा उमेदवारांच्या पाठिशी जाईल की नाही याची शाश्वती भाजपाला देखील नाही.अशावेळी पंकजा मुंडे भाजपाचा ओबीसी चेहरा म्हणून पुढे येवू शकतो. या राजकारणात गोपीनाथ मुंडेंचा वारसा असणार्‍या पंकजा मुंडेंना पुन्हा मध्यवर्ती भूमिकेत आणणं महत्त्वाचं ठरतं थोडक्यात सांगायचं तर राज्यातलं ओबीसी विरुद्ध मराठा राजकारण त्यात पंकजा मुंडेंचं ओबीसी असणं आणि मराठवाड्यात त्या सक्रीय नसणं याचा फटका भाजपाला बसू शकतो त्यामुळे पंकजा मुंडेंना सध्याच्या स्थितीमध्ये भाजप हाय कमांडला राज्यसभेवर घेणे अपेक्षित आहे शेवटी अंतर्गत राजकारणामध्ये काय होईल हे सांगता येत नाही. गेल्या दोन आठवडयापासून जे काही सुरु आहे त्यावरुन पंकजा मुंडेंनेही मिळते जुळते घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यांनी दोन दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं त्यापुर्वी पक्षाच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणे यावरुन पक्षाकडूनही त्यांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे द्योतक आहे.

पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याचा दुसरं कारण म्हणजे सध्याची राजकीय सोय भारतीय जनता पक्ष सध्या 45+ चा आकडा पार करण्यासाठी एकेक लोकसभेची समीकरण जोडण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येते. शिवाय लोकसभेनंतर येणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी देखील भाजपाने आतापासूनच सुरु केली आहे. पंकजा मुंडेंना राज्यसभेवर जरी डावललं तर भाजपासमोरच्या अडचणी वाढू शकतात यातली पहिली अडचण म्हणजे त्यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी लागेल मात्र पंकजा मुंडेंनी यापुर्वीच आपण लोकसभा लढणार नाही प्रितम मुंडेंच उमेदवार असतील असे वर्षापुर्वीच जाहीर केले आहे. पंकजा मुंडेंना राज्यसभेवर घेण्यामागे बीड लोकसभा आणि परळी विधानसभा या दोन्ही मधूनही मार्ग काढणे पक्षाला सोपे जाणार आहे. मुंडेंच्या राज्यसभेवर जाण्यामुळे प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे यांना कोणताही धक्का लागत नाही. शिवाय पंकजा मुंडे केंद्रात जात असतील तर राज्यातल्या वरिष्ठांना देखील पंकजा मुंडेंच्या राजकीय महत्त्वाकांक्षाचा किंवा हस्तक्षेपाचा फटका बसू शकत नाही. या निर्णयामुळे बीड लोकसभेसाठी पंकजा आणि धनंजय मुंडे यांचे दोन्ही गट सक्रियपणे प्रीतम मुंडेंसाठी काम करू शकतात. धनंजय मुंडे आणि अजित पवारांच्या मार्फत मराठा मतदार जोडण्याचं काम तिथं होऊ शकतं याशिवाय ओबीसी मतांचा एक गठ्ठा पाठिंबा मिळवण्यात सुद्धा भाजप यशस्वी होताना दिसेल.आज पंकजा मुंडेंचा राजकीय प्रभाव हा बीडमधल्या सगळ्याच्या  विधानसभा आणि परभणी ते नगर अशा भागातल्या वंजारी समाज बहुसंख्य असणार्‍या एकूण दहा विधानसभा मतदारसंघावर आहे. नाशिक तसेच, खानदेश आणि विदर्भातही काही मतदारसंघात वंजारा आणि बंजारा बहु मतदार असलेल्या मतदारसंघावरही पंकजा मुंडेंचा परिणाम होवू शकतो त्यामुळे काही जागा एकतर्फी काढण्याचे नियोजनही भाजपाकडून होवू शकते.
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.