सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 

सहाय्यक अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाची कारवाई

 

बीड | वार्ताहर

बीड जिल्ह्यात गोवंशय पशुधनाची कत्तलखान्याकडे होणारी वाहतूक लपून राहिलेली नाही. केज आणि अंबाजोगाई परिसरात यापूर्वी अनेकदा अशा कारवाया करण्यात आल्या.दरम्यान गुरुवारी (दि.8) दुपारी केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मिना यांच्या पथकाने कत्तलीसाठी गोवशीय प्राण्यांना घेऊन जात असलेला एक टेम्पो केज - कळंब रस्त्यावरील संतोष पॅलेससमोर पकडला. या कारवाईदरम्यान सात जणांना पोलिसांनी अटक केली, त्यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

 

 

अरबाज ईस्माईल कुरेशी, शिराज ईस्माईल खान पठाण, वसीम यासीन पठाण, शाहरूक मुजीब ईनामदार ( सर्व रा. रोजा मोहल्ला, केज ), अनसार ईसाक सय्यद ( रा. केज ), नागेश रतन शिंदे ( रा. वरपगाव ता. अंबाजोगाई ), फारूक गफुर कुरेशी ( रा. कुरेशीनगर, केज ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी  पोलीस नाईक अनिल मंदे यांच्या फिर्यादीवरून 7 जणांविरुद्ध केज पोलिसात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

 गोवंशीय गुरे टेम्पोतून कत्तलखान्याकडे नेली जात असल्याची गुप्त माहिती केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मिना यांना मिळाली होती त्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना केल्या.पथकातील पोलीस नाईक विकास चोपणे, अनिल मंदे, माने, भुंबे, डापकर, मुंडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी सापळा रचून केज - कळंब रोडवरील हॉटेल संतोष पॅलेस समोर टेम्पो ( एम. एच. २३ - ७४३ ) ताब्यात घेतला. टेम्पोची झडती घेतली असता त्या टेम्पोमध्ये त्यात २ गाय, २ बैल, ३ कारवड, ७ गोरे, १ वगार व ४ रेडे अशा २० गुरांचा समावेश आहे. पथकाने चालकाकडे केलेल्या चौकशीत ही गुरे कत्तलखान्याकडे जात असल्याचे निष्पन्न झाले. तर वाहन चालकाकडे पशु वाहतूकीचा परवाना नसताना त्याने क्रूर पद्धतीने टेम्पोत जनावरे घालून वाहतूक करीत असल्याचे ही आढळून आले. पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेत १ लाख ९५ हजार रुपयांची गुरे व २ लाख ५० हजार रुपयांचा टेम्पो असा ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.