नेकनूर । मनोज गव्हाणे
नेकनूर येथील निखिल सर्वज्ञ यास संशोधनाची आवड असल्याने भूगर्भशास्त्र या विषयाची निवड केली आणि भूगर्भशास्त्रात रस वाटू लागला मग हाच करिअरचा मार्ग त्यांनी निवडला. या क्षेत्रातील शिखर गाठायचे म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अप्लाइड जिओलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले , त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धनबाद (झारखंड) इंजिनिअरिंग जिओलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत त्यांनी स्पर्धा परीक्षेची वाट धरली आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी देशात सोळावा क्रमांक मिळविला. निखिलचे भूगर्भशास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.
बीड तालुक्यातील नेकनूर येथील निखिल रत्नाकर सर्वज्ञ ‘कम्बाईन जिओ सायंटिस्ट ण्ड जिओलॉजिस्ट’ परीक्षेत हे यश मिळविले. त्यांचे शालेय शिक्षण नवोदय विद्यालय गढी येथे महाविद्यालयीन शिक्षण योगेश्वरी महाविद्यालय अंबेजोगाई येथे केले त्यानंतर पुणे विद्यापीठातून इील ॠशेश्रेसू ची पदवी घेतली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असणार्या प्रवेश परीक्षेतही चांगले गुण होते. त्यामुळे निखिल यांना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सहज प्रवेश मिळाला असता. परंतु ‘भूगर्भशास्त्र’ विषयातील करिअर त्याला खुणावत होते.त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाऐवजी भूगर्भशास्त्राची वाट निवडली. त्यासाठी त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अप्लाइड जिओलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धनबाद (झारखंड) इंजिनिअरिंग जिओलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. सध्या राष्ट्रीय सागर संशोधन संस्था पणजी गोवा येथे प्रकल्प सहाय्यक म्हणून कार्यरत असताना संशोधनाचा मार्ग निखिल यांच्यासाठी मोकळा होता. परंतु, त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरविले. या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात अपयश आले. पण, अधिक जोमाने दुसर्यांदा परीक्षा देत घवघवीत यश मिळविले.दरवर्षी देशभरातील अंदाजे दहा ते पंधरा हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात. यंदा देशभरातील 190 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेनंतर मुलाखतीच्या वेळी जवळपास 550 उमेदवार होते. त्यातून निखिल यांची 16 व्या क्रमांकाने निवड झाली आहे. आता ते लवकरच ट्रेनिंग सेंटर ला प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. त्यानंतर देशातील वेगवेगळ्या ठिकाणी 11 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) मध्ये भूगर्भशास्त्रज्ञपदावर रुजू होतील.
निखिलने असा केला अभ्यास
Leave a comment