ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात पुतण्याचा मृत्यू ;काका गंभीर

माजलगाव । वार्ताहर

माजलगाव शहरातून जाणार्‍या पंढपूर खामगाव (पालखी मार्ग) या राष्ट्रीय महामार्ग -548 सी वर दुचाकीचे टायर रोडवर पडलेल्या भेगामध्ये अडकल्याने दुचाकीचालक रस्त्यावर पडला. याचवेळी त्यांच्या अंगावरून ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला तर त्यांचे काका गंभीर जखमी झाले. अपघाताची ही घटना 10 जानेवारी रोजी घडली. पात्रुड (ता.माजलगाव) जवळच्या जिजामाता शाळेसमोर घडली.

गजानन मारुती वगरे (36) असे मयताचे नाव आहे तर त्यांचे काका बळीराम मधुकर वगरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. खामगाव- पंढरपूर रोडची अवस्था दयनीय झाली आहे.ठिकठिकाणी रोडला भेगा पडून या भागांमध्ये दुचाकी स्वरांची टायर अडकून अनेक अपघात होत आहेत. गेल्या एक महिन्यात पाच ते सहा अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला.

पैकी या अपघातात माजलगाव तालुक्यातील सोन्नाथडी येथील गजानन मारुती वगरे व बळीराम मारुती वगरे हे दुचाकीवरुन तेलगावहून माजलगावकडे येत होते.त्यांच्या दुचाकीचे पाठीमागील  चाक रस्त्यावरील भेगांमध्ये अडकले अन् ते रस्त्यावर पडले. याचवेळी माजलगावहून तेलगावकडे जाणारे ट्रॅक्टर गजानन मारुती वगरे  यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे काका बळीराम मधुकर वगरे हे जखमी झाले आहेत. शवविच्छेदन माजलगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.