एसपींच्या हस्ते कामगाराला पुर्ण रक्कम साभार परत

 

बीड । वार्ताहर

 

 

फलटण येथे जाण्यासाठी बीड बसस्थानकात मुक्कामी थांबलेल्या ऊसतोड कामगाराच्या पँटच्या खिशातील 34 हजारांची रक्कम पहाटेच्या सुमारास 2 चोरट्यांनी हातोहात लंपास केली. या प्रकरणी शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. दरम्यान ज्याने रक्कम चोरुन नेली त्याने त्याच्या अन्य एक साथीदाराला त्यातील पाचशे रुपये दिले होते. संबंधितांनी ही बाब ऊसतोड कामगाराला सांगितली. नंतर त्याला पोलिस ठाण्यात नेल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर शिवाजीनगर ठाण्याचे  पो.नि.केतन राठोड व पोलीसांनी  दोघांना 24 तासात गजाआड करत चोरीची संपुर्ण रक्कम त्यांच्याकडून हस्तगत करत 10 जानेवारी रोजी पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकून यांच्या हस्तेे फिर्यादीला परत दिली. रक्कम परत मिळाल्याने ऊसतोड कामगाराने शिवाजीनगर पोलीसांचे आभार मानले.

 

 

संजय भिमराव राठोड (35, रा. कुंभेजळगाव ता.गेवराई) असे त्या ऊसतोड कामगाराचे नाव आहे. ते व त्यांची पत्नी उफाळा साखर कारखाना फलटण येथे काम करतात खाजगी कामानिमित्त गावी आल्यानंतर राठोड दांम्पत्य पुन्हा कारखान्याला जाण्यासाठी 5 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता बीड बसस्थानकात आले होते. यावेळी त्यांनी गावी कापूस विक्रीतून आलेले 34 हजार रुपये सोबत घेतले होते. बीड बसस्थानकातून फलटणला जाण्यासाठी रात्री बस न भेटल्याने ते दोघे बसस्थानकातील पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. दरम्यान पहाटे 4 च्या सुमारास संजय यास जाग आली असता पँटच्या खिशातील रक्कम गायब झाल्याचे लक्षात आले. हा प्रकार त्यांनी पत्नीला सांगत आजूबाजूला विचारपूस केली त्यावेळी तेथे थांबलेल्या एका अनोळखीने तुमचे पैसे जालिंदर शेषेराव वाघमारे (रा.गजानन कॉलनी पेठ बीड) याने काढून घेतले असून त्यातील 500 रुपये मला दिल्याचे सांगितले.

 

 

 

दरम्यान, संजय राठोड ने हा सर्व प्रकार ड्युटीवरील पोलीसांना सांगितल्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीस शिवाजीनगर ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्याची चौकशी केल्यानंतर त्याने भरत रघुनाथ झांबरे (रा.पोखरी ता.जि.बीड) असे स्वतःचे नाव सांगत घटनाक्रम कथन केला. दरम्यान या माहितीवरुन शिवाजीनगर पोलीसांनी दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे गतिमान केली. त्यानंतर दोन्ही आरोपीस 24 तासाच्या अटक करत चोरीची सर्व रक्कम हस्तगत केली. 10 जानेवारी रोजी एस.पी.नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते ती रक्कम राठोड यांना साभार परत करण्यात आली. शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांच्यासह बोंबाळे मेजर उपस्थित होते. शिवाजीनगर  पोलीसांच्या या कारवाईचे ऊसतोड कामगारांनी स्वागत केले आहे.
 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.