बीड । वार्ताहर

केबलसह कॉपर वायर चोरी करणारी पाच आरोपींची टोळी गजाआड करण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश आले. या टोळीकडून कॉपर चोरीचे दहा गुन्हे उघड झाल्याची माहिती पो.नि.संतोष साबळे यांनी दिली. रमेश चंदु पवार, गणेश हरी पवार, सोमनाथ हरी पवार व एक विधी संघर्षग्रस्त बालक तसेच केबल खरेदी करणारा शंकर शिवराम गायकवाड (रा.पांगरबावडी,ता.बीड) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

टॉवरवरील कॉपर, रॉड, मोटारीचे कॉपर वायर चोरी वांरवार घडत असल्याने अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे करणारी टोळीचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश  पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,बीड यांना देण्यात आले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी अशा प्रकारचे चोरी करणारी इसमांची विश्लेषण करून एलसीबीच्या पथकास गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले. नेकनूर, गेवराई, पाटोदा,अंमळनेर या भागातून केबल-वायर चोरी हे रमेश चंदु पवार व त्याचे इतर साथीदार करीत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांचे इतर आणखी तीन साथीदारांसह  तांदळवाडीघाट, रौळसगाव, लिंबागणेश, डोंगरकिन्ही, पाटोदा,पाली, खाडवी, रांजणी, गढी, पेंडगाव अशा एकुण दहा ठिकाणी केबल- वायर व इतर प्रकरच्या चोर्‍या केल्याचे सांगितले.

 

चोरी केलेला वायर हे बीड येथील इसम नामे शंकर शिवराम गायकवाड यास विक्री करत असल्याचे सांगितले. त्यानंतर शंकर गायकवाड यास बीड येथे ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने वर नमुद आरोपींसोबत स्वत:ची जितो वाहनासह चोरी केलेल्या असल्याचे निष्पन्न झाले.  ही कामगिरी एसपी नंदकुमार ठाकूर, एएसपी सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.संतोष साबळे, उपनिरीक्षक सुशांत सुतळे, उपनिरीक्षक संजय तुपे, सफौ. तुळशीराम जगताप, पोह. रामदास तांदळे , मारुती कांबळे , बालकृष्ण जायभाये, देविदास जमदाडे, पोना. राजू पठाण, पोशि.अर्जुन यादव, पोह. नसीर शेख, कैलास ठोंबरे, अशोक दुबाले, राहुल शिंदे, भागवत शेलार, बाळु सानप, बप्पा घोडके, चालक अतुल हराळे, चालक मराडे व अश्विनकुमार सुरवसे यांनी केली.

दहा गुन्ह्यांची झाली उकल
पावणेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

आरोपींकडून नेकनूर व गेवराई ठाणे हद्दीतील प्रत्येकी 3 , बीड ग्रामीण हद्दीतील 2, पाटोदा व अंमळनेर हद्दीतील प्रत्येकी 1 असे एकूण 10 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. आरोपींकडून पोलीसांनी 2 लाख 77 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हयातील 4 आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक अशा 5 इसमांना पुढील तपासकामी नेकनूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलेले असून इतर 4 आरोपींना अटक करणे बाकी आहे. सदर टोळीकडुन अशा प्रकारचे इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पो.नि.संतोष साबळे यांनी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.