संतोष सोहनी यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे एसपींनी केले कौतुक

बीड | वार्ताहर

शहरासह जिल्हाभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शहरातील प्रसिद्ध मॉ वैष्णोदेवी मंदिरात मोठ्या भक्तीमय आणि उत्साहाच्या वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळी घटस्थापना झाल्यानंतर सायंकाळी बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते सपत्नीक देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी मॉ वैष्णोदेवी मंदिर संस्थानचे संस्थापक अध्यक्ष तथा कॅटचे मराठवाडा अध्यक्ष संतोष सोहनी यांच्यासह भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी येथील नवरात्र उत्सवाच्या नियोजनाचे तोंड भरून कौतुक केले.  

 बीड शहरातील प्रसिद्ध माॅं वैष्णो देवी मंदिर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी  सकाळी नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. हि घटस्थापना श्री क्षेत्र चाकरवाडी देवस्थानचे महंत ह. भ. प. महादेव महाराज,  ह.भ.प. समाधान महाराज, संपादक जालिंदर धांडे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती अमर नाईकवाडे (नगरसेवक), स्वप्नील देशमुख, शिवप्रसाद लाहोटी, रामविलास सोहनी, संतोष सोहनी संजय सोहनी, जुगल किशोर दायमा, जगदिश तुमरे, गर्ने माया, अरुण ओझा, विनोद पिंगळे यांची होती. माॅं वैष्णव देवी मातेचे दर्शन बीड जिल्ह्यातील भाविक भक्तांना व्हावे, यासाठी कॅटचे राज्य उपाध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष संतोष सोहनी यांनी बीड शहरातील विप्र नगर या ठिकाणी भव्य दिव्य असे माॅं वैष्णो देवी मंदिर उभारले. या मंदिरामुळे अनेकांना बीडमध्येच वैष्णवी देवीचे दर्शन होत आहे. आजपासून नवरात्र उत्सव सुरू होत असून आज वैष्णो देवी मंदिरामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे संस्थापक अध्यक्ष संतोष सोहनी,  कोषाध्यक्ष संजय सोहनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी विविध कार्यक्रम विधिवत होणार आहेत.  तरी भाविक भक्तांनी नवरात्र उत्सवामध्ये वैष्णवी देवी मातेचे मनोभावे दर्शन घ्यावे असेही आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे. मंदिराचे पुजारी हरी महाराज यांनी पुजा केली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.