बीड | वार्ताहर
बीड शहरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
ही घटना किरकोळ कारणावरून दोघात झालेल्या वादानंतर घडल्याची माहिती समोर आली आहे. झालेल्या वादात एकाने पिस्टल मधून गोळीबार केला. जखमीच्या छातीत गोळी अडकली असल्याचे सांगितले जात असून उपचारासाठी जखमीला सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले आहे.
ही घटना बीड शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पात्रुड गल्लीमध्ये रविवारी रात्री साडेअकरा ते पावणे बाराच्या दरम्यान घडली. घटना घडल्यानंतर आरोपीने पोबारा केला. पोलिसांचे दोन पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहेत अशी माहिती शहर पोलिसांनी दिली.
Leave a comment