मुंबई : दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवली आहे. उद्यापासून 2000 रुपयांच्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत. बँकेत नोटा जमा करण्याची मुदत आरबीआयने वाढवली आहे. आज रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आता, नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत मिळाली आहे.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी अजूनही 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या नसतील त्यांना आता 7 ऑक्टोबरपर्यंत नोटा बदलता येणार आहे. एकाच वेळी कमाल 20 हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
आरबीआयनुसार, 29 सप्टेंबर 2023 पर्यंत 96 टक्के 2000 रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या 3.56 लाख कोटी मूल्याच्या नोटा चलनात होत्या. त्यानंतर आतापर्यंत 3.42 लाख कोटी रुपये मूल्य असणाऱ्या नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत.
तुमच्याकडे अजूनही 2000 च्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. 2 हजारच्या नोटेसंदर्भात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने महत्वाचे निर्देश दिले होते. आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती. यासाठी बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली होती. पण यात आता मुदतवाढ देण्यात आली आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही दोन हजारांच्या नोटा बँकेत बदलू शकता. काही कारणास्तव दोन हजारांच्या नोटा कोणाला बदलता आल्या नसतील तर त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. 7 ऑक्टोबरपर्यंत जवळच्या बँकेत तुम्ही या नोटा बदलू शकता असं आरबीआयने म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे.
7 ऑक्टोबरनंतर काय?
आरबीआयने (RBI) जारी केलेल्या निवेदनात 7 ऑक्टोबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलल्या नाहीत तर यानंतर त्या बँकेतही जमा करता येणार नाहीत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी वापरता येणार नाहीत. पण यातही आरबीआयने ग्राहकांना दिलासा दिला आहे. काही कारणाने 7 ऑक्टोबरपर्यंत नोटा बदलता आल्या नाहीत तरी काळजी करण्याचं कारण नाही. आरबीआयच्या 10 क्षेत्रीय कार्यालयात दोन हजाराच्या नोटा बदलू शकता येणार आहेत. पण एकावेळी केवळ 20 हजार रुपयांपर्यंतची मुभा असणार आहे.
19 मे रोजी झाली होती घोषणा
भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी 2 हजारच्या नोटा चलनात बाद करत असल्याची घोषणा केली होती. बाजारात मोठ्या प्रमाणात चलनात असलेल्या दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठ 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली. सर्व बँका आणि आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयात या नोटा जमा केल्या जात होत्या. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च 2023 पर्यंत 3.56 लाख करोड रुपये मुल्य असलेल्या दोन हजारांच्या नोटा चलनात होत्या.
96% नोटा परत
आरबीआयने सप्टेंबरच्या सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार 31 ऑगस्टपर्यंत चलनात असलेल्या दोन हजारच्या 93 टक्के नोटा आरबीआयमध्ये जमा झाल्या होत्या. आता या आकड्यात वाढ झाली असून 96 टक्के नोटा जमा झाल्या आहेत. 29 सप्टेंबर 2023 पर्यंत 3.42 लाख करोड रुपयांच्या नोटा जमा झाल्या असून 0.14 लाख करोड मुल्य असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोदा अजूनही बाजारात आहेत.
2016 मध्ये एन्ट्री 2023 मध्या आऊट
गुलबा रंगाच्या 2000 हजारच्या नोटा नोव्हेंबर 2016 मध्ये चलनात आल्या. केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नवी करन्सी बाजारात आली. बंद करण्यात आलेल्या 500 नोटांच्या जागी नव्या 500 च्या नोटा आणि 1000 रुपयांच्या जागी गुलाबी रंगाच्या 2000 हजार रुपयांची नोट बाजारात आली. पण 2018-19 ते 2000 दरम्यान दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली.
2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय का?
2000 रुपये मूल्याची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये जारी करण्यात आली. त्या वेळी चलनात असलेल्या सर्व 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा एका झटक्यात चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती. सामान्य व्यवहारांसाठी दोन हजार रुपयांची नोट वापरली जात नसल्याची बाब समोर आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या "क्लीन नोट पॉलिसी" च्या अनुषंगाने, 2000 रुपये मूल्याच्या बँक नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Leave a comment