राष्ट्रवादीचे नेते बळीराम गवते यांचे प्रतिपादन; बेलुऱ्यात एक कोटीच्या विकास कामाचे उद्घाटन
बीड | वार्ताहर
शहरांचा झपाट्याने विकास होत आहे, परंतु ग्रामीण भागातील विकास कामांना चालना देणे आवश्यक आहे. यासाठी आपण कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि सचिन मुळुक यांनी महायुतीच्या माध्यमातून प्रमाणिक प्रयत्न करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँगे्रसचे बीड विधानसभा मतदारसंघाचे नेते बळीराम गवते यांनी केले. ते बेलूरा (ता.बीड) येथे एक कोटी रूपयांच्या विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
बेलूरा येथे विविध विकास कामांसाठी १ कोटी रूपयांचा निधी कृषीमंत्री धनंजय मुंडे, शिवसेना जिल्हाप्रमूख सचिन मुळूक यांच्या पुढाकारातून मंजूर झालेला आहे. मंगळवार दि.१९ रोजी विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. या कामांमध्येबेलुरा गाव अंतर्गत सिमेंट रस्ता करणे,बेलुरा नारायणगड रोड ते प्रभाळे वस्ती सिमेंट रस्ता करणे,बेलुरा गाव अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसवणे,बेलुरा विठ्ठल गवते यांचे घर ते वैजिनाथ गवते यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे,जि.प.प्रा.शाळा बेलुरा वर्ग खोली बांधकाम करणे,बेलुरा गाव अंतर्गत सिमेंट रस्ता करणे, बेलुरा येथे गेटेड बंधारा,बेलुरा येथील विठ्ठल शिवशाही मंदीर येथे ट्रान्सफॉरमर बसवणे,बेलुरा येथील सोनवणे वस्ती येथे ट्रान्सफॉरमर बसवणे, बेलुरा येथील लाटे मळा वस्ती येथे ट्रान्सफॉरमर बसवणे अशी कामे आहेत.
यावेळी विनायक गवते, सरपंच दिलीप गिरी, किसन गवते, चेअरमन नंदू गवते, शामराव गवते, ग्रामपंचायत सदस्य गोविंद गवते, भरतरी भवर, रामनाथ गवते, आबासाहेब गवते, प्रकाश लाटे, पांडुरंग गवते, सत्यश्वर गवते, नामदेव केदार, शहादेव गवते, हनुमान सोनवणे, अशोक गवते, तात्यासाहेब लाटे, महादेव होले,भैया लाटे,पप्पू गवते, नारायण काळे, उद्धव गवते, रेवन भवर, भागवत लाटे, सचिन भवर, आबासाहेब आहेर, पांडुरंग आहेर, गणेश आहेर, दत्ता लाटे, आप्पासाहेब इंदूरे, बाबा भवर, लहू लाटे, ओमप्रकाश गवते, आश्रजी गवते, गोरख लाटे, बाळू गवते आदि उपस्थित होते.
Leave a comment