चांद्रयान-3 आज संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर (lunar surface) उतरणार असल्याने प्रत्येक भारतीयांच्या मनात धाकधूक वाढली आहे. गेल्या मोहिमेत अपयश आल्याने या चांद्रयान-3 कडे (isro moon mission) सर्वांचे लक्ष लागलं आहे. 45 दिवसांचा प्रवास करुन पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पडून चांद्रयान - 3 हळूहळू चंद्राजवळ पोहोचलं आहे. चांद्रयान-3 चे मुख्य लक्ष्य चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणे हे आहे. यानंतर यानातील प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) चार तासांनी बाहेर आल्यानंतर ते चंद्राच्या पृष्ठभागावरून माहिती गोळा करणार आहे. या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सहा चाकी प्रग्यान रोव्हर चंद्रावर भारताच्या राष्ट्रीय चिन्हांची छाप सोडणार आहे.
चांद्रयान-3 चे (Chandrayaan-3)लँडर 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान कधीही चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरू शकते. तशी याची नेमकी वेळ ही संध्याकाळी 06:04 वाजेची आहे. चाँद्रयानाचं लँडर हे पूर्णपणे स्वयंचलित आहे. त्यामुळे लँडिंगची जागा तो स्वतःच शोधल आणि योग्य ठिकाणी उतरेल.
मात्र असं असताना इस्रो (Isro) ने संध्याकाळीच लँडिंग करण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जेव्हा अंधारात चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रमचं लँडिंग का केलं जात आहे. पण याचं कारण म्हणजे जेव्हा विक्रम लँडरचं (Vikram Lander) लँडिंग होईल तेव्हा पृथ्वीवर भारतात संध्याकाळ असेल पण त्यावेळी चंद्राच्या त्या भूभागावर सूर्योदय होत असेल. म्हणून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी ही वेळ निवडली आहे.
ISRO चे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी सांगितले की, ज्या वेळी आपण विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवत आहोत. त्यावेळी भारतासह अनेक देशांमध्ये संध्याकाळ असेल पण त्याचवेळी सूर्य मात्र चंद्रावर उगवला असेल. लँडिंगची ही वेळ यासाठी निश्चित केली आहे की, जेणेकरून लँडरला 14 ते 15 दिवस सूर्यप्रकाश मिळावा यासाठी हे केले जात आहे. जेणेकरून त्याला सर्व वैज्ञानिक प्रयोग व्यवस्थित करता येतील.
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की ते सूर्यप्रकाशातील ऊर्जा घेऊन चंद्रावर एक दिवस घालवू शकतात. चंद्राचा एक दिवस हा पृथ्वीच्या 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. म्हणजेच 14 दिवस संपल्यानंतर हे लँडर आणि रोव्हर काम करणार नाही असं म्हणता येणार नाही. कारण ज्या भागत लँडर आणि रोव्हर असेल तिथे जेव्हा पुन्हा सूर्य उगवेल तेव्हा हे दोन्ही पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
चंद्रयान ३ लँडिंग ऑनलाइन बघण्याचे तीन मार्ग
- इसरोच्या वेबसाइटवर चंद्रयान ३ सॉफ्ट लँडिंग लाइव्ह बघण्यासाठी तुम्ही https://www.isro.gov.in/ वर जाऊ शकता किंवा इथे क्लिक करून थेट वेबसाइटवर जाऊ शकता.
- ISRO Official युट्युब चॅनेलवर लाइव्ह बघण्यासाठी तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करा.
- फेसबुक पेजच्या माध्यमातून ऑनलाइन चंद्रयान लँडिंगसाठी https://www.facebook.com/ISRO वर जा किंवा इथे क्लिक करून थेट त्या पेजवर जाऊ शकता.
- जर तुम्ही Chandrayaan 3 ह्या मार्गांनी ऑनलाइन पाहू शकतं नसाल तर टीव्हीवर DD National वाहिनीवर देखील हे लँडिंग लाइव्ह दाखवलं जाईल.
चंद्रयान ३ मिशन
चांद्रयान ३ १४ जुलै रोजी अवकाशात झेपावलं होतं त्यानंतर २२ दिवसांनी चांद्रयान ३ चंद्राच्या कक्षेत पोहोचलं होतं. प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल मिळून प्रक्षेपणाच्या वेळी चांद्रयान ३ चं वजन ३९०० किलो किलो होतं. चांद्रयान ३ च्या प्रक्षेपणासाठी लाँच वेहिकल मार्क ३ (एलव्हीएम ३) चा वापर उरकण्यात आला होता. विशेष म्हणजे एलव्हीएम ३ मध्ये पृथ्वीनजीकच्या कक्षेत सर्वाधिक १० हजार किलो वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे.
20 मिनिटांचा थरार असेल कसोटीचा
बुधवारी चांद्रयान-3 चे विक्रम लँडर चंद्रावर प्रत्यक्ष उतरण्याआधीची शेवटची 20 मिनिटे इस्रोच्या वैज्ञानिकांसाठी आणि तमाम भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. टी-20 च्या सामन्याच्या उत्कंठावर्धक शेवटपेक्षाही थरारक असा हा टप्पा असणार आहे.
- विक्रम जेव्हा चंद्रापासून 25 कि.मी. अंतरावर असेल तेव्हा बंगळूरच्या कमांड सेंटरमधून सूचना मिळताच विक्रम लँडर खाली यायला सुरुवात येईल.
- त्यावेळी त्याचा वेग भयंकर म्हणजे 6048 किमी प्रतितास अर्थात 1.68 किमी प्रतिसेकंद एवढा असेल. हा वेग विमानाच्या वेगाच्या दहापट असेल.
- यानंतर विक्रम लँडरची इंजिन्स सुरू होतील. त्यामुळे ते त्याचा वेग कमी करून त्याला चंद्राला समांतर ठेवतील. ही प्रक्रिया तब्बल 11 मिनिटांची असेल.
- या प्रक्रियेदरम्यान विक्रम लँडर सुचनांनुसार हवेत बाजू बदलत आपले पाय चंद्राच्या पृष्ठभागाच्या 90 अंशात आणेल. म्हणजे त्यावेळी विक्रम लँडर उभे असेल.
- चंद्रापासून 800 मीटर उंचीवर यान आल्यावर त्याची गती शून्य होईल. ते हळूहळू 150 मीटर उंचीवर येउन स्थिरावेल.
- त्याच वेळी विक्रम लँडर खालच्या चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे घेत पृष्ठभागाचे विश्लेषण करून कमीत कमी धोक्याची आणि उतरण्यास सुयोग्य अशी जागा शोधेल.
- जागा निश्चित केल्यावर विक्रम लँडरची चारपैकी दोन इंजिन बंद होतील. आणि ते 3 मीटर प्रतिसेकंद या वेगाने खाली येईल व पायांवर ते चंद्रावर उतरेल.
- लँडरच्या सेन्सरने चंद्राचा पृष्ठभागाचा स्पर्श झाल्याचे कळवताच उरलेली दोन्ही इंजिनही बंद होतील.
Leave a comment