बीड। वार्ताहर

 

हिंदू धर्मात श्रावण महिन्याचं विशेष महत्व आहे. मान्सुनचे वेध लागले की, शिव भक्तांना श्रावणाचे वेध लागतात. अशा सर्व शिवभक्तांसाठी ही आनंदाची बातमी आहे की, यंदाता श्रावण महिना १ नाही तर २ महिन्यांचा असणार आहे. त्यामुळे यंदा श्रावणी सोमवारही ४ ऐवजी ८ येणार आहेत.

हा योग तब्बल १९ वर्षांनी आला आहे. तर यंदा किती ते किती असणार श्रावण महिना आणि श्रावणी सोमवारच्या तिथी जाणून घेऊया.

श्रावण हा सणांचा महिना. या महिन्यात वातावरण आल्हाददायक असते. त्यामुळे अनेकांना श्रावणाची प्रतीक्षा असते. भगवान शंकराच्या भक्तांसाठी तर हा महिना म्हणजे पर्वणीच असतो. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविक उपवास करून शिवशंकराला बेलपत्री वाहत असतात. यावर्षी अधिक श्रावण असल्याने श्रावण महिना ३० नव्हे तर ५९ दिवसांचा असणार आहे. त्याचप्रमाणे श्रावण सोमवार ८ असतील. मात्र, श्रावण सोमवारचा उपवास १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान येणाऱ्या (नि. श्रावण महिन्यात) सोमवारीच करावा, असे महाराष्ट्रीय पंचांगकर्त्या विद्याताई राजंदेकर यांनी सांगितले. २१ ऑगस्ट (नागपंचमी), २८ ऑगस्ट, ४ व ११ सप्टेंबर २०२३ या तारखांना श्रावण सोमवारचा उपवास करायचा आहे.

हिंदू पंचांगमध्ये प्रत्येक तिसऱ्या वर्षात एक महिना अतिरिक्त असतो, त्यामुळे त्याला अधिक मास म्हणतात. वैदिक पंचांगात सूर्य आणि चंद्राच्या आधारे गणना केली जाते. चंद्र महिना ३५४ दिवसांचा आणि सौर महिना ३६५ दिवसांचा असतो. यामुळे दरवर्षी ११ दिवसांचा फरक पडतो, जो ३ वर्षांत ३३ दिवसांचा होतो. हे ३३ दिवस समायोजित करण्यासाठी, दर तिसऱ्या वर्षी एक अतिरिक्त महिना असतो; त्याला मलमास म्हणतात. त्याला पुरुषोत्तम महिना असेही म्हटले जाते. या दोन श्रावण महिन्यांची विभागणी अधिक श्रावण आणि निज श्रावण अशी केली जाते. अधिक श्रावण महिना १८ जुलैपासून सुरू होईल आणि निज श्रावण १७ ऑगस्टपासून सुरू होईल व तो १५ सप्टेंबरला संपेल.

 

हिंदू पंचांग

हिंदू पंचांगानुसार श्रावण हा पाचवा महिना असतो. यात श्रावणी सोमवारला विशेष महत्व असतं. या दिवशी उपास ठेवून शंकराचे व्रत करणे फार फलदायी समजले जाते.

श्रावणी सोमवारच्या तिथी

पहिला सोमवार - १० जुलै

दुसरा सोमवार - १७जुलै

तिसरा सोमवार - २४ जुलै

चौथा सोमवार - ३१ जुलै

पाचवा सोमवार - ७ ऑगस्ट

सहावा सोमवार - १४ ऑगस्ट

सातवा सोमवार - २१ ऑगस्ट

आठवा सोमवार - २८ ऑगस्ट

अधिक श्रावण महिन्यामुळे रक्षाबंधन, गणेशचतुर्थी, महालक्ष्मी पूजन, नवरात्र, दसरा, दिवाळी असे सर्वच महत्त्वाचे सण जवळपास महिनाभराने पुढे ढकलले आहेत. यावर्षी दसरा २४ ऑक्टोबर रोजी आहे. एरव्ही ऑक्टोबर महिन्यात येणारी दिवाळी यंदा १४ नोव्हेंबर रोजी आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.