विभागीय आयुक्त केंद्रेकरांची सरकारकडे शिफारस
छत्रपती संभाजीनगर । वार्ताहर
कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात डोक्यावर झालेलं कर्ज आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (र्डीपळश्र घशपवीशज्ञरी) यांनी आठही जिल्ह्यात एक सर्व्हे केला आहे. ज्यात पाच लाख कुटुंबाचे 12 टप्प्यात आणि 100 प्रश्न तयार करुन हा सर्व्हे करण्यात आला आहे. तर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकर्यांना खरीप आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी प्रती एकर 10 हजार रुपये रोख रक्कम देण्याचा निकष या सर्व्हेमधून काढण्यात आला आहे. तर याबाबतचं अहवाल सरकारला देणार असल्याची माहिती सुनील केंद्रेकर यांनी दिली आहे.
सर्व्हे करताना प्रश्नांचे एकूण बारा विभाग करण्यात आले. यात एकूण 104 प्रश्नांची माहिती अधिकार्यांमार्फत भरुन घेण्यात आली. यात आत्महत्या करण्याच्या विचारत असलेल्या शेतकर्यांची वेगळी यादी तयार करण्यात आली. तर अशा शेतकर्यांचा शासकीय खर्च करुन समुपदेशन करण्यात आले. याबाबत बोलताना केंद्रेकर म्हणाले की, सध्या शेतकर्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही एक सर्व्हे केला. ज्यात आमच्या जिल्हाधिकारी यांनी देखील स्वतः शेतकर्यांच्या घरी जाऊन माहिती जमा केली. संपूर्ण सर्व्हेचा डेटा ऑनलाईन केला. ज्यात जे शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारत असल्यास त्याचा रेड अलर्ट दिसतो. त्यामुळे अशा शेतकर्यांना कार्यालयात बोलावून त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांची अडचणी समजून घेतल्या जात आहे. तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. पण शेतकरी आत्महत्या करण्याचं महत्वाचा कारण आर्थिक परिस्थितीच आहे. त्यामुळे पेरणीच्या वेळी शेतकर्यांना 10 हजार रुपये प्रती एकर दिल्यास आत्महत्या रोखण्यात यश येऊ शकते असे केंद्रेकर म्हणाले. विशेष म्हणजे अशाप्रकारे सरकारकडे शिफारस करणारे केंद्रेकर पहिले अधिकारी आहे.
Leave a comment