तृणमुल काँग्रेस आणि सीपीआयलाही फटका
ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेससह तृणमुल काँग्रस पक्ष आणि सीपीआय पक्ष आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत.
किमान चार राज्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व असणे गरजेचे आहे. या सगळ्या नियमांमधून राष्ट्रवादी अपात्र ठरला आहे. केवळ राष्ट्रवादी पक्षच नाही तर आणखी काही पक्षांवर देखील ही कारवाई केली आहे.
राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळवण्यासाठीचा निकष काय?
देशातील कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष हा दर्जा देण्यासंदर्भातील काही नियम आणि निकष आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाचा निकष हा या संबंधित पक्षाचे किती लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. पक्षाच्या उमेदवारांना 4 किंवा त्याहून
अधिक राज्यांमधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण मतदानाच्या 6 टक्के मतं मिळणं आवश्यक असतं. तसेच लोकसभेमधील 2 टक्के जागा पक्षाकडे असतील तरच त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. त्याचप्रमाणेच
लोकसभेमध्ये ज्या पक्षाचे 3 राज्यांमधून किमान 11 खासदार असतील तरच पक्षाला राष्ट्रीय पक्ष दर्जा दिला जातो.
महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाकडून काढून घेण्यात आला आहे. त्यामुळं शरद पवारांना मोठा राजकीय धक्का
बसला आहे. राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या अटी पूर्ण करण्यात राष्ट्रवादी पक्ष सक्षम नसल्यामुळं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचं
महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील मतांची टक्केवारी आणि संख्याबळ लक्षात घेता निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळं शरद पवारांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.
राष्ट्रीय पक्षांच्या यादीत असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगानं काढून घेतला आहे. त्यामुळं आता देशात भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी असे तीन प्रमुख
राष्ट्रीय पक्ष उरले आहेत. यापूर्वी मायावती यांचा बहुनज समाज पक्षाला देखील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता. परंतु पक्षाने अटी पूर्ण न केल्याने बसपाचा राष्ट्रीय दर्जा देखील काढून घेण्यात आला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस आणि
भाकपचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला आहे.
राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी कोणत्या अटी आहेत?
१. संबंधित पक्षाला चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा असायला हवा.
२. लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत किमान सहा टक्के मतं मिळायला हवी.
३. निवडणुकीतील सहा टक्के मतं चार राज्यांतील असायला हवीत.
४. देशातील कोणत्याही राज्यात चार खासदार असायला हवेत.
५. मिळालेल्या एकूण मतांपैकी दोन टक्के जागांवर पक्षाचा विजय झालेला असावा.
६. विजयी उमेदवार चार वेगवेगळ्या राज्यातील असावेत.
राष्ट्रीय पक्षांना अनेक फायदे
राष्ट्रीय पक्ष हा दर्जा असलेल्या राजकीय पक्षांना अनेक फायदे मिळतात. राष्ट्रीय पक्षांना देशातील सर्व राज्यांमध्ये एकाच निवडणूक चिन्हावर लढता येतं. राष्ट्रीय पक्ष असलेल्या राजकीय पक्षांना नवी दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी जागा मिळते.
सर्वात आधी 2019 ला झाली मागणी
2019 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पक्ष दर्जाचा फेरविचार व्हावा अशी मागणी करण्यात आली. याचवेळी सीपीआय आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला देण्यात आलेला राष्ट्रीय पक्षांच्या दर्जाबद्दलही पुन:विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली होत. मात्र त्यानंतर दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता या तिन्ही पक्षांचा राष्ट्रीय पक्ष हा दर्जा काढून घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १९९९ साली झाली. तेव्हापासून हा पक्ष राज्याच्या राजकारणामध्ये सक्रीय होता. तसेच या पक्षाने देशाच्या राजकारणातही ठसा उमटवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकेकाळी देशाचे केंद्रीय कृषीमंत्रीदेखील होते. १० जानेवारी २००० रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा कायम होता. पण २०१४ निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्षासंदर्भात त्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि नागालँड याठिकाणचे राष्ट्रवादीचे अस्तित्व कमी झालेले आहे.
Leave a comment