बीड | वार्ताहर

जिल्ह्यात माजी सैनिकांसाठी होत असलेले काम व क्षयरोग निर्मूलनासाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

आज दि. 19 ऑगस्ट रोजी अंबाजोगाई शासकीय विश्रामगृह येथे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक प्रसंगी ते बोलत होते.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज दि. 19 रोजी दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यासाठी अंबाजोगाई येथे आगमन झाले यावेळी त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले.

राज्यपाल कोश्यारी यांना पोलीस पथकाकडून मानवंदना देण्यात आले त्यानंतर बैठकीच्या ठिकाणी त्यांचे आगमन झाले.जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या कामाची माहिती त्यांनी जाणून घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे देशभरात विविध नवीन संकल्पनातून योजनांबद्ध अंमलबजावणी केली जात आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी शर्मा यांनी माजी सैनिकांच्या साठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. सर्वोच्च  न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे सद्यस्थितीत गायरान जमिनीचे हस्तांतरण केले जात नाही परंतु माजी सैनिकांना शासकीय व इतर क्षेत्रातील संधी उपलब्ध करून दिले जात आहेत असे सांगितले.जिल्हा सैनिक कार्यालयाचे संजय देशपांडे यांनी यावेळी माहिती सादर केली.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची माहिती दिली. ग्रामीण भागात 52 प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालय , लोखंडी सावरगाव येथील भव्य 1000 घाटांचे रुग्णालय आणि स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून बीड तसेच शेजारील जिल्ह्यातील जनतेला देखील आरोग्य सुविधांचा लाभ मिळत आहे.क्षयरोग निर्मूलनासाठी जिल्ह्यात चांगले काम होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देश पातळीवर सुरू केलेल्या मोहिमेच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात देखील घरोघरी सर्व्हे बरोबरच आणि शिबिर देखील आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली. 

 याप्रसंगी क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल तसेच जिल्ह्यातील माजी सैनिक कल्याण आणि आरोग्य क्षेत्रात होत असलेल्या कामांंबद्दल राज्यपाल महोदय यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.या बैठक प्रसंगी अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी शरद झाडगे, तहसीलदार अंबाजोगाई बिपीन पाटील, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे संजय देशपांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब लोमटे उपस्थित होते. 

विविध संघटना व व्यक्तींकडून स्वागत

अंबाजोगाई शासकीय विश्रामगृह येथे राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या स्वागतासाठी माजी सैनिक संघटना,  सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते . श्री अक्षय मुंदडा, श्री राम कुलकर्णी, कमलाकर कोपले, सुरेश कराड, संजय गंभीरे, शेख रहीम सारंग पूजारी, माजी सैनिक पांडुरंग शेप,उस्मान पठाण यांच्यासह अंबाजोगाई नगरपालिकेतील पदाधिकारी व सदस्य यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .

राज्यपालांनी घेतले योगेश्वरी देवीचे दर्शन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिरास भेट दिली. त्यांनी योगेश्वरी देवीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली. त्यांचे हस्ते यावेळी महाआरती करण्यात आली.मंदिर व्यवस्थापन समितीच्यावतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हस्ते राज्यपाल महोदय यांचे  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंदिराचे ट्रस्टींनी देवीचा फोटो व शाल देऊन राज्यपाल महोदय सत्कार केला. मंदिर व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गिरिधारी भराडिया, सचिव अँड शरद लोमटे , सदस्य  डॉ.संध्या जाधव, राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे , प्राध्यापक अशोक लोमटे , पूजा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.

 याप्रसंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने राज्यपाल श्री कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले . पुरातन योगेश्वरी मंदिराच्या विकासासाठी निधी व शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी याद्वारे करण्यात आली.यावेळी  जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार. अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडगे, तहसीलदार (अंबाजोगाई ) बिपीन पाटील आदींची उपस्थिती होती.मंदिर व्यवस्थापन समितीच्यावतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हस्ते राज्यपाल महोदय यांचे  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंदिराचे ट्रस्टींनी देवीचा फोटो व शाल देऊन राज्यपाल महोदय सत्कार केला. मंदिर व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गिरिधारी भराडिया, सचिव अँड शरद लोमटे , सदस्य  डॉ.संध्या जाधव, राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे , प्राध्यापक अशोक लोमटे , पूजा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. याप्रसंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने राज्यपाल श्री कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले . पुरातन योगेश्वरी मंदिराच्या विकासासाठी निधी व शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी याद्वारे करण्यात आली.यावेळी  जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार. अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडगे, तहसीलदार (अंबाजोगाई ) बिपीन पाटील आदींची उपस्थिती होती.

 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

यांनी घेतले परळी वैजनाथाचे दर्शन

 राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता परळी येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र परळी वैजनाथ या देवस्थानास भेट देत  त्यांनी परळी वैजनाथाचे आज दर्शन घेतले. कोश्यारी यांच्या हस्ते परळी वैजनाथास दुग्धाभिषेक व महाआरती करण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ, श्री वैजनाथ देऊळ समितीचे अध्यक्ष राजेश देशमुख आदींची उपस्थिती होती.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.